हिंगणघाट (जि. वर्धा) : सर्वत्र कोरोना विषाणूचे सावट असताना हिंगणघाट येथे आता नव्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. शहरातील रिठे कॉलनी परिसरात गत काही दिवसांपासून वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागात घरात, विहिरीवर, भिंतीवर, वॉलकंपाउंडवर, छपरावर शंख असलेल्या गोगलगायी दिसू लागल्या आहेत. या गोगलगाईमुळे मेंदूज्वराचा धोका उद्भवत असल्याने नागरिकांत भीतीचे सावट आहे.
एका घरातून सकाळच्या सुमारास २०-३० गोगलगायी टोपलीने भरून बाहेर काढाव्या लागत आहेत. घराचे दार उघडताच सकाळी गोगलगायींचा सडा पडलेला असतो. महिला, मुलांना याची भीती वाटत असल्याने घरच्या पुरुषांना सकाळी या गोगलगायींना उचलावे लागत आहे.
१९६० च्या दशकात दक्षिण फ्लोरिडामध्ये सर्वप्रथम जायंट आफ्रिकन गोगलगाय (लिसाचॅटिना फुलिका किंवा जीएएस) सापडली. त्यांच्या निर्मूलनासाठी १० वर्षे कालावधी लागला. २०११ मध्ये त्याचे पुनरुत्पादन करण्यात आले आणि सध्या निर्मूलनाचे प्रयत्न चालू आहेत.
शंख गोगलगाय मानवी आरोग्यावर परिणाम करते. कारण ती बॅक्टेरीया, वॉर्म, नेमोटेड पॅरासाईटसारख्या जंतूचा वाहक आहे. गोगलगाय मुळात हानिकारक नसली; तरी स्वतः नेमोटेड पॅरासाईटची वाहक असल्याने मेंदूज्वरसारखे आजार माणसांना उद्भवू शकतात. या गोगलगायीवर असणारे बॅक्टेरिया, परजीवी नेमोटेड मानवाच्या स्पायनल कार्डवर आघात करून मेंदूज्वरसारखे महाभयंकर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जगभरात ५५ हजार प्रजाती
काही नागरिक गोगलगायींचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांच्यावर मीठ, फिनाईलची फवारणी करीत आहेत. गोगलगाय शंख हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. शंखावरील गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेते. या गोगलगाईचे शास्त्रीय नाव लिसाचॅटिना फुलिका किंवा जीएएस, असे आहे. जगभरात या गोगलगाईच्या आजपर्यंत ५५००० निरनिराळ्या जाती शास्त्रज्ञांनी नमूद केल्या आहेत.
- प्रा. गौरव घुगरे, हिंगणघाट.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.