अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनामुळे समाजमन खिन्न झाले आहे. अश्यातच वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतही गेल्या वीस दिवसांत सात मुली व महिलांवर अत्याचार झाल्याच्या
घटनांमुळे समाजस्वास्थ बिघडत आहे. ऐवढेच नव्हे तर यामध्ये नात्यालाही काळीमा फासला जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे.
हैदराबाद व उन्नाव येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण भारतातील समाजमन पेटून उठले आहे. महिलांवरील अत्याचाराची घटना निंदाजनक आहे यात शंका नाही. मात्र, यानंतरही दिवसेंदिवस महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना
समोर येत आहेत. यातच गुन्हेगारीच्या पटलावर असलेले अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील घटना घडत आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात अकोला जिल्ह्यात अशाच तीन किळसवाण्यात घटनांनी लक्ष वेधले होते.
हेही वाचा - कोई भी मुजरीम माॅ की कौख से पैदा नही होता
बुलडाण्यात घडल्या चार घटना
आता मागील वीस दिवसात यात आणखी भर पडली आहे. बुलडाणा जिल्ह्यात चार अत्याचार व एक अतिप्रसंगाचा प्रयत्नाची घटना घडली. तर वाशीम जिल्ह्यात एक व अकोला जिल्ह्यात एक अशा घटना उघडकीस आल्या आहे. या वाढत्या घटनांमुळे
वऱ्हाडातील मुली व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जन्मदाता बनला नराधम
जन्मदात्या पित्यानेच झोपेच्या गोळ्या देऊन त्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुलडाणा येथे (ता.3) उघडकीस आली होती. तसेच वाशीम मध्येही नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना (ता.11) समोर आली होती. या प्रकारात जन्मदाताच नराधम बनत असल्याने नात्याचेही भान राखले जात नसल्याचे दिसून येते.
विशेष बातमी - जिल्हा परिषद निवडणुकीत नवाच वाद
अत्याचार अन् खूनाचा थरार
हैदराबादच्या घटनेची पुनरावृत्ती जळगाव जामोद तालुक्यात झाली. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे राहणाऱ्या दिव्यांग महिलेवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने अत्याचार करून खून केल्याची घटना (ता.7) घडली होती. मद्यधुंद अवस्थेत आरोपीने केलेल्या या कृत्याचा जिल्हाभरात निषेध करण्यात आला.
क्लिक करा - सोयाबीन पाच हजाराकडे!
बदनामीची भीती; विद्यार्थिनीची आत्महत्या
वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे एका विद्यार्थिनीची व्हिडीओ क्लिप व्हायरल केल्यामुळे बदनामीच्या भीतीने तिने आत्महत्या केल्याची घटना (ता.3) घडली होती. याप्रकरणात विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील शिक्षकही सहभागी असल्याचे
संताप व्यक्त केला गेला.
सविस्तर वाचा - सातबारा कोरा होणार का?
येथेही घडल्या निंदनीय घटना
मेहकर येथे मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ असून, तुला भूईमुंगाच्या शेंगा खायला देतो, माझ्या घरी चाल असे म्हणून एका 12 वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. ही घटना (ता.4) घडली. खामगाव तालुक्यात अल्पवयीन गतिमंद मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना (ता.10) घाटपुरी येथे घडली होती. सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे एका युवकाने विवाहित महिलेवर अत्याचाराची घटना (ता.11) घडली होती. सॉफ्टड्रींकमध्ये गुंगीचे औषध पाजून युवतीवर युवकाने अत्याचार
केल्याची घटना अकोला शहरातील खडकी भागात (ता.19) घडली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.