Solar Projects : सोलरच्या ग्राहकांसमोर सबसिडीचा प्रश्न;पीएम सूर्यघरचे पोर्टल बंद राहिल्याने अडकले अनुदान

आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व नंतर वेबसाइटची समस्या, यामुळे पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतील लाभार्थींना सबसिडीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या योजनेचे पोर्टल बंद असल्याने ग्राहकांची कोट्यवधींची सबसिडी अडकली आहे.
Solar Projects
Solar Projectssakal
Updated on

अमरावती : आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व नंतर वेबसाइटची समस्या, यामुळे पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतील लाभार्थींना सबसिडीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या योजनेचे पोर्टल बंद असल्याने ग्राहकांची कोट्यवधींची सबसिडी अडकली आहे. अमरावती जिल्ह्यातील २ हजार ८१५ लाभार्थींचा समावेश आहे. दरमहा तीनशे युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांसाठी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल बसवण्याची तरतूद असून मध्यम, निम्न मध्यम व सामान्य ग्राहकांसाठी लाभदायी ठरणारी योजना आहे.

वीजबिलात बचत होण्यासोबत किलोवॅटच्या क्षमतेने सबसिडी दिल्या जात असल्याने ग्राहक आकर्षित झालेत. १ ते २ किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीसाठी ३० हजार प्रती किलोवॅट व त्यानंतरच्या ३ किलोवॅटसाठी १८ हजार सबसिडीची रक्कम जाहीर करण्यात आली. फेब्रुवारी २०२४ मध्ये सबसिडीच्या या योजनेस मान्यता देण्यात आली व सामान्य ग्राहकांना लाभ मिळावा, यासाठी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले. प्रारंभी काही दिवस सुरळीत चाललेले पोर्टल गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरळीत चालत नसल्याने ग्राहकांसह सौरऊर्जा वेंडर्सना मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली.

सोलर पॅनल लावल्यावर मिळणारी सबसिडी केंद्राकडून दिल्या जाते. त्याचा महावितरणशी काहीच संबंध नाही. तथापि लोकसभा आचारसंहिता व नंतर वेबसाइट बंद राहण्याची समस्या उद्भवल्याने ग्राहकांना सबसिडी मिळू शकलेली नाही. आता आचारसंहिता हटल्याने व वेबसाइट दुरुस्त करण्यात येत असल्याने ग्राहकांना त्यांची सबसिडी दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गदारोळ झाल्यानंतर आता हे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी मध्यंतरी ग्राहक व वेंडर्सकडून करण्यात आलेल्या प्रश्नांवर समाधान न केल्याने असंतोष निर्माण होऊन योजनेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

जिल्ह्यात २ हजार ८१५ ग्राहक

अमरावती जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मिती पॅनल बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या २ हजार ८१५ इतकी असून यातील ५७४ ग्राहकांचे पॅनल बसवण्यात आले आहेत. तर २२४१ ग्राहकांची प्रक्रिया सुरू आहे. पॅनल लागलेल्या एकूण ग्राहकांपैकी काहींना सबसिडी मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र उर्वरितांना सध्या येत असलेल्या अनुभवामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान महावितरणने लवकरच ग्राहकांना सबसिडी दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.