‘नको ते गॅस सिलिंडर, आपली चुलच बरी’; सिलिंडरच्या किमती भडकताच ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीवर

As soon as the price of a cylinder goes up Ujjwala is on the stove again
As soon as the price of a cylinder goes up Ujjwala is on the stove again
Updated on

आगरगाव (जि. वर्धा) : सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव आकाशाला भिडले आहेत. यात दर महिन्याला सिलिंडर घेणे आर्थिकदृष्ट्या अवघड होत आहे. यापेक्षाही बिकट अवस्था केंद्र सरकारच्या ‘उज्ज्वला’ योजनेत सिलिंडर घेणाऱ्यांची आहे. वाढलेले दर त्यांना परवडणारे नसल्याने ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायला लागल्या आहेत.

केंद्र शासनाने ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेत त्या धूरमुक्‍त होण्याकरिता उज्ज्वला योजना अंमलात आणली. त्यांना प्रारंभी अनुदानावर सिलिंडर दिले. आता त्यांना सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे त्यांना हे सिलिंडर घेणे परवडत नाही. त्यात सध्या दररोज सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची पाळी आली आहे. हीच स्थिती वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या योजनेची झाली आहे.

सध्या शहरी भागात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर ८२९ रुपये आहे. हे सिलिंडर ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरी पोहोचेपर्यंत ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचते. त्यामुळे आता ‘नको ते गॅस सिलिंडर, आपली चुलच बरी’, असे म्हणण्याची वेळ ग्रामिणांवर आली आहे. 

लाभार्थ्यांच्या कमाईत होतो फक्‍त सिलिंडर

प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी हे दारिद्रयरेषेखालील आहेत. दररोज मोलमजुरी करून ते आपली उपजीविका भागवितात. मात्र, सध्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पूर्ण मजुरी त्यांना यावरच खर्च करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांनी स्वयंपाक चुलीवर सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.