खरिपात या पिकांचा पेरा राहणार समतोल, असा आहे कृषी विभागाचा अहवाल...वाचा

soyabean crops.jpg
soyabean crops.jpg
Updated on

खामगाव (जि.बुलडाणा) :  कोरोनाच्‍या धामधुमीत मे महिना उजाडला असून कृषी विभागाच्‍या वतीने येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्‍यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्‍या वतीने पीका खालील पेरणी क्षेत्राचा अंदाज दर्शविणारा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये मागील वर्षी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या सोयाबीन व कपाशी पिकाचा पेरा यंदाही थोड्या फार फरकाने समतोलच राहणार असल्‍याचे दिसून येते.

मागील वर्षी दमदार पावसामुळे पिके जोमदार असतांना ऑक्‍टोबर महिन्‍यात झालेल्‍या अवकाळीने होत्‍याचे नव्‍हते केले. त्‍यानंतरही नाउमेद न होता शेतकऱ्याने रब्‍बीची तयार केली. तर यावेळी अवकाळीचा फटका बसला व उरले सुरले पीक घरात आले तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्‍या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना आपला मालही विकता आला नाही.

त्‍यामुळे यंदाच्‍या हंगामात खरीपाची पेरणी म्‍हणजे शेतकऱ्यांसाठी एक यक्ष प्रश्‍नच बनला आहे. खरीपाची नासाडी झाल्‍याने तालुक्‍यात फक्‍त 5 हजार 516 इतकेच घरगुती बियाणे असून ऐन पेरणीच्‍या वेळी शेतकऱ्यांची धांदल उडणार व व्‍यापारी याचा फायदा घेणार हे  निश्‍चितच आहे. त्‍यामुळे बियाण्यांचा काळा बाजार रोखण्यासाठी कृषी विभागाच्‍या वतीने पथके तयार करण्यात आली आहेत.

बियाण्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पथक
मागील वर्षी खरीप हंगाम अवकाळीने बाधित झाल्‍यामुळे यंदा काही प्रमाणात बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे बोगस बियाणे किंवा जास्‍त किंमतीने बियाणे विकल्‍या जावू नये यासाठी तालुक्‍यात भरारी पथक नेमण्यात आले आहे.

25 मे पासून बिटी बियाण्याची विक्री
बिटी बियाणे विक्रीला सध्या बंदी नसली तरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहता विक्रेत्‍यांद्वारा 25 मे नंतरच बीटी बियाण्यांची विक्री सुरु करण्यात येणार आहे.

कारवाई करण्यात येऊन दुकानदाराचा परवाना रद्द
खरिपामध्ये बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकाचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये काेठेही कोणत्‍याही बियाण्यांचा काळाबाजार झाल्‍यास, साठेबाजी केल्‍यास एमआरपीपेक्षा अधिक दराने बियाण्यांची विक्री केल्‍यास कारवाई करण्यात येऊन दुकानदाराचा परवाना रद्द केला जाईल.
- जी. बी. गिरी, तालुका कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()