Malkapur : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर तालुक्यातील तांदुळवाडी नजीक खामगाव आगाराची बस दुभाजकावर आदळून पलटी होऊन त्यात सहा ते सात प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दिनांक 29 जुलै रोजी सकाळी ९.३० सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, खामगाव आगाराची खामगाव ते शिर्डी बस क्र.एम.एच.४० वाय.५५७६ ही बस प्रवाशांना घेऊन शिर्डी कडे जात असताना मलकापूर तालुक्यातील तांदुळवाडी नजीक समोर चालत असलेल्या ऑटो चालकाने अचानक ब्रेक लावला. दरम्यान ऑटोला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने ब्रेक लावल्याने बस अनियंत्रित होऊन दुभाजकावर जाऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या बस अपघातात शरद बारसू झोपे रा.तळणी, गोविंद भास्कर नारखेडे रा. बोराखेडी, वर्षा माधव भारंबे, रा.नरवेल, मंदा पंजाबराव देशमुख, रा.वसाळी खुर्द तालुका नांदुरा , माधव नारायण भारंबे, रा.नरवेल ता. मलकापूर, वैष्णवी देशमुख, रा. वसाळी खुर्द तालुका नांदुरा अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. बस अपघातातील जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.