राज्यातील कृषी विद्यापीठ शुक्रवारपासून सुटीवर 

pkv
pkv
Updated on

वरोरा (जि. चंद्रपूर) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून राज्यातील कृषी विद्यापीठातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी सामूहिक रजा आंदोलनाच्या माध्यमातून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलासंलग्नित, महारोगी सेवा समिती वरोराद्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरोरा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे.

राज्यातील जवळपास सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासूनचा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. परंतु, कृषी विद्यापीठातील कर्मचारी तथा प्राध्यापकांना यापासून वंचित ठेवल्यामुळे यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे.

राज्यातील कृषी क्षेत्रातील शिक्षण संशोधन आणि विस्ताराच्या क्षेत्रात अग्रभागी असलेले हे विद्यापीठ शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्यरत आहे. विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय नोकर असा दर्जा असल्यामुळे शासनाच्या सर्व सोयीसुविधांचा लाभ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे. परंतु, सातव्या वेतन आयोग, आश्‍वासित प्रगती योजनेचेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

या मागणीसाठी गतवर्षी आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. येत्या जानेवारीमध्ये सातव्या वेतन आयोगाला पाच वर्षे पूर्ण होऊनसुद्धा ते कर्मचाऱ्यांना लागू न झाल्यामुळे नाइलाजास्तव आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे.

राज्यस्तरीय कृती समितीच्या सुचनेप्रमाणे हे आंदोलन विविध टप्प्यांमध्ये सुरू करण्यात आले. 27 तारखेपासून काळी फीत लावून निषेध नोंदविण्यात आला. 2 ते 5 नोव्हेंबरपर्यंत लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. दरम्यानच्या काळात लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. आता सामूहिक रजा आंदोलन केले जात आहे.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.