Uday Samant: मोठी बातमी! यवतमाळमध्ये उदय सामंतांच्या ताफ्यावर दगडफेक

Uday Samant : यवतमाळ-वाशिम येथील शेतकरीबहुल मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या पाचवेळा खासदार भावना गवळी यांना हटवून त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली
Uday Samant
Uday Samantesakal
Updated on

Uday Samant: यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. यवतमाळच्या राळेगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान हा प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने ही दगडफेक केली आहे.

यवतमाळ-वाशिम महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेला उदय सामंत देखील हजर होते. यावेळी एका अज्ञाताने त्यांच्या ताफ्यावर दगड भिरकावला, सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. पोलिसांनी अद्यापही कुणाला अटक केली नाही. पण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

यवतमाळ-वाशिम येथील शेतकरीबहुल मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या पाचवेळा खासदार भावना गवळी यांना हटवून त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यवतमाळ-वाशिमची लढत चांगलीच तापली आहे. त्या कुणबी समाजाच्या असून हिंगोलीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत.

यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत आहे. संजय देशमुख हे शिवसेनेचे (UBT) उमेदवार आहेत. काँग्रेस आपली पारंपारिक मुस्लिम, दलित व्होटबँक आपल्या मित्रपक्ष शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवाराकडे हस्तांतरित करू शकते की नाही यावरही निकाल अवलंबून असेल.

Uday Samant
निवडणुकीच्या तोंडावर 'एनडीए'च्या बिहारमधील एकमेव मुस्लिम खासदाराची एक्झिट! पक्षांतराने ‘इंडिया’चे बळ वाढणार

या मतदारसंघाने तेव्हापासून झालेल्या तिन्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप उमेदवारांना मतदान केले आहे. यवतमाळ-वाशीममधील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेकडे संजय राठोड हा एकच आमदार आहे. भाजपकडे चार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक आमदार आहे.

Uday Samant
Philip Salt KKR vs RCB : 6,0,6,6,W,1W कर्ण शर्मानं चोपलं! अखेर सॉल्टनं सर्वात महागड्या खेळाडूची वाचवली लाज; पाहा VIDEO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.