नागरिकांनो लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताना सावधान; चौकाचौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त

नागरिकांनो लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताना सावधान; चौकाचौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त
Pix_Pratik
Updated on

अमरावती : आठ महिन्यांच्या पहिल्या लॉकडाउननंतर (Lockdown) मिळालेली सूट लक्षात घेता त्यानंतर आठ दिवसांची पुन्हा शहरात संचारबंदी (Curfew) लागू झाली. प्रशासनातील विविध घटक कोरोना विरुद्धची लढाई लढत असताना दुसरीकडे रस्त्यावर बेशिस्तांना शिस्त लावण्याची धुरा पोलिसांवर आली आहे. (strict Police checking in Amravati during curfew)

नागरिकांनो लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताना सावधान; चौकाचौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त
काय सांगता! तब्बल ४० टक्के कोरोना योद्ध्यांनाही अजून मिळाली नाही लस

शहरातील मुख्य चौकासह जिल्ह्यांच्या सीमांवरसुद्धा बॅरिकेट लावून रविवारी (ता. नऊ) दुपारी बारानंतर नाकाबंदी सुरू झाली. भर उन्हात दुपारनंतर पोलिसच दिसत होते. अमलबजावणी करण्यापूर्वी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी वेळ दिला होता. त्यानंतर मात्र रस्त्यावर पायदळ, दुचाकीने किंवा वाहनाने फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना पोलिस दिसत होते.

राजकमल चौक, पंचवटी, इर्विन चौक, चित्रा चौक, बुटी प्लॉट, बडनेरा, चपराशीपुरा, कठोरा नाका परिसरात पोलिस तैनात दिसले. एकूण 45 फिक्त पॉइंट लावले होते. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त श्री. साळी यांनी मुख्य चौकात फिक्‍स पॉइंटला भेटी देऊन स्वत:ही फिरणाऱ्यांची चौकशी केली. शहर पोलिसांच्या मदतीला गृहरक्षकदलाच्या महिला, पुुरुष जवानही तैनात होते. ठाण्यातील जवळपास साठ टक्के संख्याबळ संचारबंदी काळात रस्त्यावर दिसून आले.

नागरिकांनो लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताना सावधान; चौकाचौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त
आमदार महोदय आपण आहात कुठे? रुग्णांची विचारणा; ऐन कोरोनाकाळात अनेक आमदार गायब

पहिल्या दिवशी संयम

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावानंतर सात दिवसांच्या संचारबंदीत नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. परंतु पहिल्याच दिवशी रस्त्यात तैनात पोलिस अधिकारी वाहनचालक व पादचाऱ्यांना नियम मोडू नका असेच समजावून सांगताना दिसले.

(strict Police checking in Amravati during curfew)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()