चामोर्शी (जि. गडचिरोली) - विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या जात आहेत. शालेय पोषण आहार हा याच योजनेतील एक भाग आहे. चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परीषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना मिलेट्स चॉकलेट वाटण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरी जाऊन चॉकलेटचे वेष्टन उघडताच त्यात अळ्या आढळल्या. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावार आला आहे.