Students Survey : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे होणार सर्वेक्षण';मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाऊल ,२० जुलैपर्यंत मोहीम

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. तसेच, सापडलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.
Students Survey
Students Surveysakal
Updated on

नंदोरी (जि. वर्धा ) : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. तसेच, सापडलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदादेखील प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे ५ ते २० जुलैदरम्यान सर्वेक्षण केले जाणार आहे. तसे आदेश राज्याचे प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहे.

राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच, विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते. या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पाच ते २० जुलै या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्याचे ठरविले असून, त्याबाबतची एसओपी व माहिती संकलनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण हे महत्त्वपूर्ण सामाजिक काम केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे केवळ अशक्यप्राय आहे. त्यामुळे यात शासनाच्या संबंधित सर्व विभागांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांचा सहभाग आवश्यक आहे.

Students Survey
Akola News: कुलरचा शॉक लागून मामाच्या घरी गेलेल्या दोन चिमुकलींचा मृत्यू; काळेगाव येथील हृदयद्रावक घटना

शासनाच्या अशा संबंधित विविध विभागांच्या मंत्रालयीन विभागांना संबंधित सर्वेक्षणामध्ये सर्व ग्रामीण, तसेच नागरी स्तरावर शिक्षण विभागाला सहकार्य करण्याबाबत कळविण्यात यावे, अशी मागणी प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांकडे नुकतेच केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.