दिग्रस (जि. यवतमाळ) : दिनेश गावंडे यांच्याकडे एक हेक्टर 11 आर. एवढी शेतजमीन आहे. ती कोरडवाहू आहे. त्यांचे काका संभाशिव गावंडे हे हयात असताना त्यांनी बोरवेल करून संत्राच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले होते.
त्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील परिचयाचे असलेले डॉ. उज्वल राऊत यांच्याशी संपर्क साधला. विद्यापीठातून कलमा खरेदी केल्या. त्या कलमांची सन 2008 मध्ये आपल्या शेतात लागवड केली.
2008 मध्ये लावलेल्या कलमांची काही वर्षात मोठी झाडे झाली. ही संत्र्यांची झाडे मोठी होईपर्यंत आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि चणा या पिकांची लागवड केली. यातूनसुद्धा त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. 2015 मध्ये संत्रा बागेतील झाडे फळांनी बहरली. 2015 मध्ये संत्राबागेतील फळांची विक्री करून तीन लाख 21 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले.
2016 मध्ये तीन लाख 51 हजारांचे उत्पन्न मिळविले. नंतर दोन वर्षे पावसाच्या लहरीपणामुळे झाडांना बहर आला नाही. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी थोड्या बहुत प्रमाणात पावसाने साथ दिली. त्यामुळे यावर्षी संत्राबाग ही फळांनी बहरली आहे. प्रत्येक झाडाला अडीच ते तीन हजार एवढी फळे लागली आहेत.
सध्या दहा ते बारा लाख रुपयांनी या संत्राबागेला व्यापाऱ्यांकडून मागणी आहे. निसर्गाची अशीच साथ असल्यास या पेक्षाही जास्त उत्पन्न या बागेतून होईल, असा विश्वास गावंडे यांनी व्यक्त केला.
असे का घडले? : मोबाईलवर नको त्या गोष्टी बघायचा, आईने हिसकावल्याने केले हे...
भरीव अनुदानाची गरज
शासन फळबाग लागवडीसाठी हेक्टरी एक लाख रुपयांचे (प्रती झाड 361 रुपये) अनुदान देते. त्यामुळे झाडाच्या संगोपनासाठी फक्त 361 रुपये अशी रक्कम शासन फळबाग लावलेल्या शेतकऱ्यांना देते.
शेतकरीवर्गाला प्रोत्साहन मिळावे आणि शेतकरी आत्महत्या टाळता याव्या, यासाठी इतर वृक्षारोपणाच्या संगोपन खर्चाप्रमाणे फळबाग लागवडीसाठी भरीव अनुदान देण्यात यावे, जेणे करून युवा शेतकरी फळबाग शेतीकडे वळतील, अशी मागणी दिनेश गावंडे यांनी "सकाळ' शी बोलताना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.