अमरावती : सेंट्रिगचे काम करताना अपघाताने एका युवकाच्या पोटात आरी घुसून आतडे बाहेर पडले. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया पूर्ण केल्याने त्याला जीवनदान मिळाले. मोर्शीच्या रामजीनगर येथील अजय भलावी (वय २५) असे जीवदान मिळालेल्या युवकाचे नाव आहे.
गत आठवड्यात इर्वीनचे डॉ. संतोष राऊत यांच्या पथकाने आतड्यांवरील गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असून, हे दोन्ही रुग्ण सुखरूप आहेत. अजय भलावी हा १९ मार्चला सेंट्रिगचे काम करीत होता. आरी चालवत असताना अचानक त्याच्या डोळ्यात कचरा गेला व आरी त्याच्या पोटात घुसून आतडी बाहेर पडली. मोर्शी येथील डॉक्टरांनी अवस्था पाहून अजयला तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले.
डॉ. संतोष राऊत यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याची प्रकृती आता सुधारली आहे. रुग्णालयातील पथकाचे सहकार्य व उपचार सुविधेमुळे आपल्याला नवा जन्म मिळाला, अशी प्रतिक्रिया अजयने व्यक्त केली. अजय यांच्या पोटातील आतडे बाहेर पडले होते. इर्मजन्सी ओळखून वेळेत उपचार केल्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
२० मार्चला इर्विनच्या शल्यचिकित्सा विभागात पोटाची आतडी फाटलेल्या एका युवकावरील शस्त्रक्रियाही पूर्ण झाली. पंकज कदम हे अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून, पुण्यात एके दिवशी लिव्हरवर सूज आल्याने कदम यांची प्रकृती बिघडली. पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. तीन रुग्णालयात उपचार घेतला. मात्र, फारसा उपयोग झाला नाही, त्यांच्यावर इर्विन रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले.
औषधे विनामूल्य उपलब्ध
बाहेर महागडी मिळणारी अनेक औषधे इर्वीनमध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात. नागरिकांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हाशल्य चिकित्सक, अमरावती
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.