बहिणीने बाथरूममध्ये डोकावून बघितले; दृष्य पाहताच धावत गेली

crime logo
crime logocrime logo
Updated on

अमरावती : तिसऱ्यांदा नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्यापोटी युवतीने घरातील स्वच्छतागृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. स्नेहल भारत कोरडे (वय २१, रा. गोपालनगर, पवननगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्नेहल ही दोन वर्षांपासून नीट परीक्षेचा अभ्यास करीत होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वडिलांनी तिला निकालाबाबत विचारणा केली असता स्नेहलने निकाल यायचा असल्याचे सांगितले व ती थेट अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. खूप वेळ झाल्यानंतरही ती बाथरूममधून बाहेर आली नाही.

crime logo
ती खोलीत गेली अन् घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

लहान बहीण बोलविण्यासाठी गेली. मात्र, आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नव्हता. बाथरूमचे दार अर्धवट उघडले होते. त्यामुळे तिने आतमध्ये डोकावून बघितले. स्नेहलने बाथरूममधील शॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. लहान बहिणीने आरडाओरड केल्यामुळे आई-वडिलांनी बाथरूमकडे धाव घेतली. तिला खाली उतरवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

डॉक्टर व्हायची इच्छा अपूर्ण

स्नेहलला एमबीबीएस करायचे होते. त्यासाठी ती नीट परीक्षा देत होती. यावेळी तिला ५५० गुण मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, तिला २९२ गुण मिळाले. त्यातून तिने हे पाऊल उचलल्याचे दिसून येते, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()