मतभेद दूर करण्यासाठी नेत्यांची मधस्थी; महाविकासआघाडीची रविवारी बैठक

मतभेद दूर करण्यासाठी नेत्यांची मधस्थी; महाविकासआघाडीची रविवारी बैठक
Updated on

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (District Central Co-operative Bank) महाविकासआघाडीची सत्ता आहे. असे असले तरी काही विषयांना बगल दिली जात असल्याने संचालकांमध्ये मतभेद वाढले (Disagreements grew among the directors) आहेत. ठरलेले विषय घेतले जात नसल्याने नेत्यांनीच संचालकांना बैठकीला न जाण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. रविवारी (ता. ३०) महाविकासआघाडीतील नेत्यांची बैठक (Meeting of leaders of Mahavikasaghadi on Sunday) होणार आहे. त्यात स्वीकृत सदस्य व सूतगिरणीला कर्ज मंजूर करणे या दोन विषयांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. (Sunday meeting of to resolve differences)

जिल्हा बॅंकेत चार महिन्यांतच महाविकासआघाडीत कुरबूर वाढली आहे. ठरल्यानुसार एकही विषय घेतला जात नसल्याने संचालक नाराज आहेत. त्यांचा प्रत्यत काही दिवसांपासून दिसत आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या काही संचालकांनी उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी १५ संचालकांनी अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीवरही बहिष्कार घालण्याच्या तयारीत संचालक होते. त्यामुळे अंतर्गत कुरघोडी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

मतभेद दूर करण्यासाठी नेत्यांची मधस्थी; महाविकासआघाडीची रविवारी बैठक
महिला दुकानदारावर बलात्कार; नागपुरातील जरीपटक्यातील घटना

बॅंकेतील नोकरभरती प्रकरण गाजत असतानाच आता संचालकांतील मतभेदही समोर येत आहेत संचालक मंडळाच्या बैठकीसाठी काही संचालक बॅंकेत पोहोचले होते. तर काही संचालकांचा या भरतीला विरोध आहे. त्यातच आता स्वीकृत संचालक व बोरी येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीला कर्ज मंजूर प्रकरणाची भर पडली आहे. या दोन मुद्दयांवरूनच आता संचालक आमनेसामने आले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातील स्वीकृत संचालकांसाठी पुसद येथील नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. ‘बंगल्या’वरून आदेश निघाल्याने माजी मंत्री पुत्राचे नाव निश्‍चित मानले जात आहे. दुसरे पद शिवसेनेच्या कोट्यात आहे. हे पद कळंब भागात जाण्याची शक्‍यता आहे. शिवसेना नेत्यांचे नातेवाईक असल्याने व महाविकास आघाडीची सत्ता असल्याने हे नाव निश्‍चित मानले जात आहे.

मतभेद दूर करण्यासाठी नेत्यांची मधस्थी; महाविकासआघाडीची रविवारी बैठक
चंद्रपुरात बाटली उभी; वर्धा जिल्ह्यावर दारूतस्करांची मदार

रविवारी महाविकासआघाडीतील नेत्यांची बैठक होणार आहे. एकीकडे स्वीकृत संचालकांचा विषय घेण्यासाठी दबाव आहे तर दुसरीकडून सूतगिरणीचे कर्जप्रकरण मंजूर करण्यासाठी काही संचालकांचे प्रेशर आहे. त्यामुळे रविवारच्या बैठकीत नेते काय निर्णय घेणार, याकडे संचालकांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेची आतापासूनच तयारी!

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून काही नेते पुत्रांना विधानसभेत पुन्हा ‘लाँच’ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काही विषय संचालक मंडळाकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. आतापासूनच तयारी करून यवतमाळ विधानसभेवर नेतापुत्र दावा करतील, अशी व्यूव्हरचना तयार केली जात आहे. त्यामुळे आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत कोणते विषय घेतले जातात, हे रविवारच्या बैठकीत ठरण्याची शक्‍यता आहे.

(Sunday meeting of to resolve differences)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.