बचतगटाने मिळाला जगण्यास आधार 

Shardula Mahajan
Shardula Mahajan
Updated on

 
नागपूर  : मनुष्यात कोणतेही गुण उपजत नसतात. परिस्थिती त्यांना सारेकाही शिकवून जाते. आलेल्या प्रसंगाला दोन हात करीत लढण्याचा विचार केला तर "ती'सुद्धा बरेच काही करू शकते. हातात कापडी पिशव्या घेऊन दारोदारी विकणाऱ्या शार्दुला आज "लंबी रोटी' केंद्रासह अनेक गृहोद्योग केंद्राच्या मालकीण आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक महिलांना स्वबळावर उभे केले. 
शार्दुला संपत महाजन (वय 55) नागपुरातील नालंदानगर येथे राहतात. पती नोकरीवरून निवृत्त. दोन्ही मुले नोकरी करतात. 1983 मध्ये लग्नानंतर शार्दुला नागपुरात स्थायिक झाल्या. एकत्र कुटुंब, मुलांचे शिक्षण व तुटपुंज्या पगारात संसार चालविणे, कठीण व्हायचे. म्हणून संसाराला हातभार लावण्यासाठी शार्दुला यांनी एक हजार रुपये गुंतवणूक करून रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. घरोघरी जाऊन कपडे विकत असल्याने त्यांना चांगली मिळकत होत होती. शार्दुला यांनी 2002 मध्ये पंतप्रधान योजनेतून कर्ज घेऊन नालंदानगरात कपडे व भांड्यांचे दुकान थाटले. मात्र आयुष्यात येणारे चढ-उतार त्यांनाही चुकले नाही. दरम्यानच्या काळात लाखो रुपयांचे कर्ज झाल्याने त्यांना दुकान बंद करावे लागले. 
परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या शार्दुलाताईंनी श्रमिक महिला गृहोद्योग नावाने सात ते आठ बचतगट तयार करून पापड, शेवया, कुरुड्या, मसाले विकण्यास सुरुवात केली. गटातील अनेक महिलांना उद्योग उभारून दिले. 2007 पासून त्यांनी "लंबी रोटी' तयार करण्याचे केंद्र उभारले. आज ही मऊ, लुसलुशीत दर्जेदार लांब रोटी ग्राहकांच्या पसंतीस उतरते. या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याकाठी तीस ते पस्तीस हजार रुपये कमाविणाऱ्या आणि सोबतच "लंबी रोटी'च्या माध्यमातून पाच ते सहा महिलांना रोजगार देणाऱ्या शार्दुलाताई "लंबी रोटी' विकणाऱ्या महाजनताई म्हणून नावारूपास आल्या आहेत. 
प्रत्येक बचतगटाने स्वबळावर उद्योग सुरू करावेत. महिलांनी पुढे येऊन उद्योग उभारणे व कुटुंबाला आर्थिक सहकार्य करणे काळाची गरज आहे. आजच्या काळात अशक्‍य असे काहीच नाही. त्यामुळे महिलांनी घराबाहेर पडून आत्मनिर्भर व्हावे. 
शार्दुला संपत महाजन 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.