Ravikant Tupkar : बुलडाण्यात खळबळ! पोलिसांच्या वेशात येत स्वाभिमानीच्या तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

गेल्या तीन दिवसांपासून तुपकर भूमिगत होते.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSakal
Updated on

Ravikant Tupkar Tried To Suicide In Buldana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Ravikant Tupkar
Air Asia : विमान कंपन्यांवर कारवाई सुरूच; एअर एशियाला DGCA ने ठोठावला २० लाखांचा दंड

त्यानंतर तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून, सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे.

Ravikant Tupkar
Warishe Murder Case: पत्रकाराच्या हत्या प्रकरणाचा तपास SIT मार्फत होणार, फडणवीसांची घोषणा

मागील तीन दिवसांपासून तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढला होता. त्यानंतर आज अचानक तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकरांच्या या कृतीने एकच खळबळ उडाली आहे.

Ravikant Tupkar
Pune Bypoll election : चिंचवडमध्ये सेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले होते.

Ravikant Tupkar
Mumbai Crime: मोबाईल रिपेअरिंगसाठी 500 रुपये मागितल्यानं खून; विचित्र घटनेत दोन भावांना अटक

मात्र नेमके बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार ? हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरानी मांडली आहे.

Ravikant Tupkar
Shashikant Warishe Death : "तुमचाही शशिकांत वारीसे करु" ; संजय राऊत यांना धमकीचे फोन

दरम्यान, तुपकरांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. तसेच पोलिसांनी तुपकरांना नोटीसदेखील बजावली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून ते भूमिगत होते. त्यानंतर आज तुपकरांनी पोलिसांच्या वेशात बुलडाणा जिल्हाधिकारी परिसरात दाखल होते स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.