कारंजा (जि.वाशीम) : अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीचा पास वापरून अवैधरित्या वाळू आणली जात होती. याची तहसीलदारांनी बुधवारी (ता.20) घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, संबंधिताने तहसीलदारांशी हुज्जत घातली. तसेच शर्ट फाडून मारहाण केली. त्यामुळे पटवारी संघटनेने या घटनेचा निषेध नोंदवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील मेमन कॉलनी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (एमएच 04, ईबी 9422) वाळू उतरवत होता. दरम्यान तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार विनोद हरणे व तलाठी संदीप गुल्हाने यांच्यासह महसूल विभागाचे अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी सदर ट्रकचालक व मालकाकडे वाळू वाहतूक परवाना आढळून आला नाही.
महत्त्वाची बातमी - कोरोना इफेक्ट : अनेकांची भंगली विदेशवारी, कारण ही सेवा करण्यात आली बंद
तर, ट्रकच्या दर्शनी भागावर फळे, भाजीपाला, राख व जळाऊ लाकूड वाहतूक करण्याचा परवाना चिकटवल्याचे दिसून आले. तर, सदर ट्रकमध्ये प्रत्यक्षात अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. तसेच, ट्रकला समोरच्या बाजूने (एमएच40, बीजी 2497) तर मागील बाजूस (एमएच04, ईबी 9422) असे दोन क्रमांक दिसून आले. दरम्यान ट्रकमालक मो. सलीम अब्दुल मजीद हासमानी याने हुज्जत घातली. तर, मनोज काळे याने फोनवरून कारवाई दरम्यान शासकिय कामात अडथळा निर्माण केला.
तर, घटनास्थळी वाळूमाफियाने तहसीलदार धीरज मांजरे यांचे शर्ट फाडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी, दोषींना अटक करून कायदेशिर कारवाई करण्यासाठी विदर्भ पटवारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना तहसीदारांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. शिवाय सदर अप्रिय घटनेचा विदर्भ पटवारी संघाने निषेधही नोंदविला.
दोषींना अटक होऊन कडक शासन करावे
प्रशासक या नात्याने कोरोना आपत्ती व्यवस्थापनाची, शेतकऱ्यांची तसेच, नागरिकांची इतरही जीवनावश्यक कामे महसूल प्रशासन करेल. मात्र, दोषींना अटक होऊन कडक शासन करावे. तेव्हाच गौण खनिज म्हणजे वाळू संदर्भातील कामे करणार, अशी भूमिका महसूल प्रशासनाद्वारे जीवित्वास धोका असल्याने घेण्यात आली आहे.
-धीरज मांजरे, तहसीलदार, कारंजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.