आजाराने वडील गेले आणि थोरली मुलगी झाली मुलगा; कुटुंबासाठी चारचाकीवर तेजस्विनीचा संघर्ष

Tejaswini pulls the of the on her fathers four-wheeler
Tejaswini pulls the of the on her fathers four-wheeler
Updated on

आंजी (मोठी) (जि. वर्धा) : आजाराने वडील गेले... मागे आई व दोन बहिणी... कर्त्याच्या सावलीपासून वंचित होणार अशी वेळ... यात घरातील पुरुष कोणी नाही... मग काय थोरली मुलगीच मुलगा बनली... तिने वडिलांचा व्यवसाय आत्मसात केला आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विडा उचलला... एखाद्या टीव्ही सिरीअल किंवा सिनेमात साजेल अशी कथा आहे आंजी (मोठी) येथील तेजस्विनी महेंद्र राऊत हिची...

महेंद्र राऊत यांना दुर्धर आजाराने ग्रासले. बराच औषधोपचार झाला. परंतु, त्यांच्यावर काळाने झडप घातली. यामुळे कुटुंबावर संकट कोसळले. या कुटुंबात आईसह तीन मुली राहिल्या. थोरली तेजस्विनी, दुसऱ्या क्रमांकाची मयुरी व तिसरी श्रेया अशा तीन मुली आहेत. घरात मुलगा नसल्याने कुटुंबावर उपासमार येणार असे सर्वांना वाटत होते. पण, मुलगी मुलापेक्षा कमी नसल्याचे साध्य करीत तेजस्विनी कंबर कसली.

महेंद्र यांच्याकडे तीन एकर शेती होती. ते देखील मदन उन्नई कालव्यात गेली. थोडाफार पैसा मिळाला होता. त्यामध्ये कुटुंब चालविणे कठीण झाल्याने त्यांनी एक चार चाकी मालवाहू घेतली. हेच मालवाहू वाहन या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी ठरले. तिने न डगमगता वडिलांचे वाहन चालविण्याचा निर्णय घेतला.

तिने ड्रायव्हिंग क्‍लास लावून परवाना प्राप्त केला. ही गाडी चालू लागली. पण ही गाडी मालवाहू होती चालवायची कशी अशी तिच्या मनात शंका येत होती. परंतु, मोठ्या वडिलांनी तिला धाडस दिले व न डगमगता तिने ही गाडी चालवण्यास सुरुवात केली. त्यापासून येणाऱ्या मिळकतीत आपले व बहिणींचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली. तिचे हे धाडस अनेकांना जगण्याचा मार्ग देणारे आहे.

बीएससीपर्यंत झाले शिक्षण

तेजस्वीनी बीएससी झाली. एवढे शिक्षण झाले असताना पुढे शिकण्याची तिची इच्छा आहे. ती पूर्ण करण्याची तिची तयारी आहे. सोबतच लहान बहिणी मयुरी आणि श्रेया यांच्या शिक्षणातही कुठलाही व्यत्य येऊ देणार नाही, असा तिचा प्रण आहे. 

मोठ्या वडिलांचे पाठबळ
वडिलांनी सुरू केलेल्या या व्यवसायात येण्यापूर्वी काही काळ जरा अवघडल्या सारखे वाटत होते. पण, मोठ्या वडिलांनी पाठबळ दिल्याने आता हा व्यवसाय करणे सोपे झाले आहे. यात इतरांकडूनही सहकार्य मिळत आहे. 
- तेजस्वीणी महेंद्र राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()