पतंग उडविण्याचा नाद बेतला चिमुकल्याच्या जीवावर

om kakarwal
om kakarwal
Updated on

मंगरुळपीर (जि.वाशीम)  : पतंग उडविण्यास गेलेल्या चिमुकल्या मुलाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.18) दुपारी शहरातील बायपास रोडलगत घडली. ओम रवींद्र काकरवाल (वय 10) रा. शहापूर असे मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम ने घरी खेळायला जातो म्हणून सांगितले आणि मित्रांसमवेत जवळच असलेल्या खरेदी-विक्री संघाच्या मोकळ्या जागेवर तो पतंग उडविण्यासाठी गेला. पतंग उडवण्यात तो मित्रांसमवेत दंग झाला. पतंग पकडण्यासाठी धावत असताना ओम खरेदी विक्री संघाच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पाय घसरून पडला असावा, असा कयास लावण्यात येत आहे.

माहिती मिळताच पोलिस व अग्निशामक दल दाखल
विहिरीत पाणी असल्याने ओम पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांनी या घटनेची माहिती मंगरुळपीर पोलिस आणि मंगरुळपीर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला दिली. मात्र, तोपर्यंत बराच वेळ निघून गेला.

पिंजरच्या पथकाला केले पाचारण
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदाळे सहायक पोलिस निरीक्षक तुषार जाधव, आजीनाथ मोरे, व पोलिस कर्मचारी यांच्यासह अग्निशमन दलाच्या पथकाने व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोध घेतला. परंतु, ओम काही सापडला नाही. नंतर पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने सुद्धा जवळपास तीन ते चार तास शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तरीही ओम सापडला नाही. सदर विहिरीत प्रचंड प्रमाणात कचरा व गाळ असल्याने शोध कार्यात खूप बाधा येत होती. 

रात्री उशिरा सापडला मृतदेह
अखेर स्वामी समर्थ इंजिनिअर्सचे कामगार यांनी संध्याकाळी सात वाजता बचाव पथकाने पोकलॅंडद्वारे सुरुवात केली होती. या वेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सायंकाळी नऊ वाजेपर्यंत ओमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी मंगरुळपीरचे तहसीलदार किशोर बागडे, नगर परिषदेचे मुख्यधीकारी मिलिंद दारोकार, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार धंनजय जगदाळे व पोलिस कर्मचारी तळ ठोकून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.