कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ! आणीबाणीची स्थिती टाळण्यासाठी धावले पोलिस

corona
corona
Updated on

अमरावती :  कोविड रुग्णालयात दाखल व्यक्तीचा उपचारादरम्यान शनिवारी (ता. २२) रात्रीच मृत्यू झाला. त्यासंदर्भातील माहिती उशिरा मिळाल्याने रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. आणीबाणीची स्थिती टाळण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. कोरोनाबाधित ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला.

नियमाप्रमाणे रुग्णालयात दाखल होत असताना, दस्तऐवजावर रुग्णाचा आणि नातेवाइकांचा मोबाईल नंबर नोंदविला जातो. संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्‍टरांनी त्याने जो मोबाईल क्रमांक दिला होता त्यावर संपर्क साधला. परंतु हा मोबाईल दाखल रुग्णाचाच निघाला. त्यामुळे नातेवाईकांपर्यंत मृत्यूची माहिती रात्री पोहोचू शकली नाही.

परिणामी रुग्णालयाकडून गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस व महापालिका प्रशासनाकडे असलेल्या नोंदीवरून मृत व्यक्तीचा पत्ता मिळाला. तेव्हा नातेवाईकांपर्यंत मृत्युची बातमी पोहोचली.

ज्यावेळी नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांनी उशिरा माहिती दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला. वडिलांची प्रकृती गंभीर आहे हे आम्हाला रुग्णालयाने कळवले नाही आणि भेटूही दिले नाही, असा मृत व्यक्तीच्या मुलाचा आरोप आहे.
त्या व्यक्तीच्या मृत्युची माहिती उशीरा दिल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांना आवरण्यासाठी अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यावर प्रकरण निवळले. असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या पत्नीची मुलाची व मुलीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली होती.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

विशेष व्यक्तींची नियुक्त
रुग्णाच्या प्रकृतीशी संबंधित माहिती दररोज सकाळी दहानंतर त्यांच्या नातेवाइकांना फोनवर संपर्क साधून दिली जाते. त्यासाठी विशेष व्यक्तींची नियुक्त केली आहे. एखाद्याच प्रकरणात अशी अडचण येते.
डॉ. शामसुंदर निकम, जिल्हाशल्य चिकित्सक, अमरावती

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.