‘हिरोशिमा-नागासाकी’सारख्याच भयंकर ‘वणी’च्या वेदना

‘हिरोशिमा-नागासाकी’सारख्याच भयंकर ‘वणी’च्या वेदना
Updated on

वणी (जि. यवतमाळ) : वणी विभागाला निसर्गाने खनिज संपत्तीची अफाट आणि अपरंपार समृद्धी बहाल (Wani department restored with unparalleled prosperity) केली. परंतु, तीच समृद्धी या भूमीच्या जिवावर उठली. कोळसा आणि दगडांच्या खाणी, सिमेंट कंपन्या, चुना भट्ट्या इथे उभारल्या गेल्या. कंपनी कायद्याचे सर्व ‘नाॅर्म्स’ धुडकावून लावत भूगर्भातील मौल्यवान संपत्तीची महालूट सुरू झाली. विकासाला विरोध न करणाऱ्या येथील भूमिपुत्रांना याचे विनाशक परिणाम भोगण्याची पाळी आली. कानाचे पडदे फाडणारे रोजचे ब्लास्ट, धुळीचे अजस्त्र लोट, कराकरा धावणारी हजारो कर्णकर्कश वाहने हे विनाशकारी ‘वरदान’ या भागाच्या वाट्याला आले. त्यामुळे पाणी प्रदूषित झाले. वायू विषारी झाला. सुपीक शेतजमीन वांझ झाली. पिके उद्ध्वस्त झाली. सर्व सजिवांचे श्वास गुदमरले. या भूमीतील प्रत्येकाला दुर्धर आजारांनी विळख्यात घेतले. गर्भवतीच्या उदरातील बाळही आता सुरक्षित उरले नाही. जपानमधील हिरोशिमा-नागासाकी (Hiroshima Nagasaki) या शहरांनी अणुबाॅम्बच्या ज्या महाभयंकर वेदना अनुभवल्या, त्यासारख्याच वेदना वणी तालुक्यातील अनेक गावांचे लोक अनुभवत आहेत. जगण्यासाठी तडफडणारे आणि श्वास उधार मागणारे लोक या भूमीत दिसतात. (Terrible-wani-taluka-pain-like-Hiroshima-Nagasaki)

वणी परिसराला नैसर्गिक वरदान लाभले आहे. झरी जामणी, मारेगाव आणि वणीच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त भाग आहे. येथून वर्धा, पैनगंगा या मोठ्याा नद्यांसोबतच निर्गुडा आणि विदर्भा नदीसुद्धा प्रवाहित असल्याने धरणी हिरवा शालू परिधान केल्याप्रमाणे दिसते. येथील भूगर्भात चुनखडी, सिमेंट दगड, डोलामाईट या खनिजांसोबतच कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावर आधारित अनेक उद्योगधंद्यांनी बस्तान मांडले आणि स्थानिकांचे जगणे मुश्किल केल्याचे अतकारे यांनी सांगितले. आणि येथील ज्वलंत समस्या लक्षात आली.

‘हिरोशिमा-नागासाकी’सारख्याच भयंकर ‘वणी’च्या वेदना
काँग्रेसचे मजबुतीकरण की भाजप, राष्ट्रवादीला शह?

वणीपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेल्या राजूर गावात भूमिगत कोळसा खाणींसोबतच अनेक चुनाभट्या आहेत. राजूर गाव चुनाभट्टीकरिता प्रसिद्ध असून, येथे निर्मित केलेल्या चुन्याला देशात चांगली मागणी आहे. त्यामुळे या गावात अनेकांनी चुनाभट्टीचा व्यवसाय थाटला. चुना निर्मिती करीत असताना निघणारा धूर मानवी आरोग्यास अपायकारक आहे. नियमांची पायमल्ली करून चुना निर्माते उत्पादन करीत आहेत. चुुनाभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे मनुष्यासोबतच शेतपिकांची हानी होते.

कोल डेपोचे स्थानांतरण नाही

यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात तब्बल ६७ व्यावसायिकांनी कोळसा साठवून देशभरात वितरण करण्यासाठी कोल डेपो थाटले. खाणीतून उत्खनन केलेला कोळसा कोल डेपोमध्ये साठविण्यात येतो. यासाठी अवजड वाहनांतून होणारे दळणवळण, कोळसा उतरविताना आणि चढवताना कोळशाची भुकटी वातावरणात पसरते. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. वणी परिसरातील मेघदूत काॅलनी, बोधेनगर, चिखलगाव येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने येथील कोल डेपो इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. २०१२ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी १२ आॅगस्टला कोल डेपो स्थानांतरित करण्यासंबंधी आदेश पारित केले; मात्र आठ वर्षे लोटूनही स्थलांतर झाले नाही.

धुलिकण, जल प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

वणी उपविभागात तब्बल १३ कोळसा खाणी आहेत. या खाणीतून उत्खनन होणारा कोळसा व मातीमुळे धुलिकण प्रचंड वाढले आहेत. तसेच कोळसा, डोलामाईट, चुनखडी, सिमेंटचे दगड यांच्या होणाऱ्या दळणवळणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतीसाठी धोकादायक ठरत आहे. शिदोला परिसरातील एसीसी सिमेंट फॅक्टरीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीमुळे गोवारी, पार्डी, शिंदोला, कुरई, चनाखा, कळमना, पाथरी, कुर्ली, आबई, वेळाबाई, खांदला, बोरगाव आदी गावांतील शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त होत आहेत. दरवर्षी कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राची पाहणी केली जाते; मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही.

‘हिरोशिमा-नागासाकी’सारख्याच भयंकर ‘वणी’च्या वेदना
नोट फाटली तर काय करायचं? जाणून घ्या नियम
वणी विभाग औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. येथे कोळसा खाणी, चुनाभट्या व गौण खनिजाच्या खाणी आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्नता असली तरी नागरिक प्रदूषणाने बेजार आहेत. उद्योग स्थापित करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी गरजेची असते. तसेच दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रत्येक उद्योगाचे आॅडीट होणे गरजेचे आहे. मात्र, या मंडळाकडून कुुठल्याही प्रकारचे आॅडीट होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ नावालाच आहे.
- ओम ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस
कोळसा उत्खनन व वाहतूक करताना शासनाने नियम व अटी घालून दिल्या आहेत. मात्र, वेकोलि प्रशासन कोणत्याही नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नाही. खाणीतून उत्खनन केलेला कोळसा ट्रकद्वारे वाहतूक करताना त्यावर ताडपत्री झाकणे गरजेचे आहे. मात्र, अनेक वाहतूक व्यावसायिक या नियमांचे पालन करीत नसल्याने कोळशाची भुकटी हवेत मिसळते. त्यामुळे वाहतूकदारांना नियमांचे पालन करण्याची सक्ती वेकोलि प्रशासनाने करावी.
- गणपत लेडांगे, माजी तालुका प्रमुख, शिवसेना

(Terrible-wani-taluka-pain-like-Hiroshima-Nagasaki)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.