यवतमाळात सैराट पार्ट २ : प्रेमीयुगलावर मुलीच्या वडिलांनी केला प्राणघातक हल्ला

यवतमाळात सैराट पार्ट २ : प्रेमीयुगलावर मुलीच्या वडिलांनी केला प्राणघातक हल्ला
Updated on

आर्णी (जि. यवतमाळ) : सैराट चित्रपटात ज्याप्रमाणे प्रिन्सने आर्ची व प्रश्या या दोघांवर शस्त्रानी हल्ला चढवून ठार मारले होते. तसाच सैराट पार्ट २ चिकणी कसबा येथे विवाहित प्रेमीयुगल सागर व शुभांगीवर मुलीच्या वडिलांनी प्राणघातक चाकू हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील चिकणी (कसबा) येथे घडली. दोन्ही जखमींवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. (The couple was fatally assaulted by the girl's father)

चिकणी (कसबा) येथील सागर काशिनाथ आंभोरे (वय २६) याचे गावातीलच शुभांगी दादाराव माटाळकर (वय २६) हिच्याशी प्रेम झाले. एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांनी सन २०१६ मध्ये गावातून पळून जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला. प्रेमीयुगलाच्या लग्नाला जवळपास पाच वर्ष झाली. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मुलीने प्रेमविवाह केल्याने बदमानी झाली असे समजून दादाराव माटाळकर यांनी चिकणी कसबा हे गाव सोडून कुटुंबीयांसह आर्णी येथे राहायला गेले.

यवतमाळात सैराट पार्ट २ : प्रेमीयुगलावर मुलीच्या वडिलांनी केला प्राणघातक हल्ला
सायकलवर समोसे विकत ओढते संसाराचा गाडा; मातेचा मुलांसाठी संघर्ष

रविवारी दुपारी साडेचार वाजता दादाराव सिताराम माटाळकर यांनी मनामध्ये राग धरून धारदार चाकूने शुभांगीच्या पोटावर, उजव्या हाताच्या मनगटावर तसेच सागर याच्या डाव्या खांद्यावर चाकूने मारून गंभीर जखमी केले. शुभांगी व सागर यांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जखमी सागर आंभोरे यांचे काका नारायण नानाजी आंभोरे (वय ३२, रा. चिकणी कसबा) यांनी आर्णी पोलिस स्टेशनला दिली. तक्रारीवरून शुभांगीचे वडील दादाराव आंभोरे (वय ५१) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. वृत्तलिहिपर्यंत आरोपीस अटक झाली नाही.

(The couple was fatally assaulted by the girl's father)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.