Water Problem : चिखलीकरांना भेडसावणारी पिवळ्या पाण्याची समस्या सुटणार; आमदार महालेंनी...

Water Problem : चिखलीकरांना भेडसावणारी पिवळ्या पाण्याची समस्या सुटणार; आमदार महालेंनी...
Updated on

चिखली: मागील काही दिवसांपासून चिखली शहरातील नागरिकांना गढूळ व पिवळ्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे होत आहे. या समस्येची दखल घेऊन आमदार श्वेता महाले यांनी १० मे रोजी पेन टाकळी सिंचन प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी मुख्याधिकारी आणि नगरपालिका पदाधिकारी अभियंत्यांसोबत चर्चा केली. लवकरात लवकर आवश्यक त्या दुरुस्त्यांवर सुधारणा करून चिखली शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना आ. महाले यांनी दिले.

Water Problem : चिखलीकरांना भेडसावणारी पिवळ्या पाण्याची समस्या सुटणार; आमदार महालेंनी...
'मनपा'च्या निविदांचा मार्ग न्यायालयातून; जूनमध्ये लागणार निर्णय

गेल्या महिन्यापासून चिखली शहरांमध्ये पिवळ्या व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नाराजीचे वातावरण होते आणि याबद्दल तक्रारी देखील वाढल्या होत्या. या तक्रारींची व चिखलीकरांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत १० मे रोजी पेन टाकळी सिंचन प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली.

या भेटीदरम्यान पेनटाकळी प्रकल्पाची पाहणी करून येथील प्रक्रियेची माहिती आ. महाले यांनी अभियंते व अधिकाऱ्यांकडून घेतली. याशिवाय उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांशी व माजी नगरसेवकांशी देखील त्यांनी चर्चा केली.

हा विषय नीट समजून घेतल्यानंतर पेनटाकळी प्रकल्पावरील हेडवर्कच्या जलवाहिनीचे तसेच व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्याचे निर्देश आ. महाले यांनी नगर पालिका प्रशासनाला दिले. या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येऊन चिखलीकरांना लवकरात लवकर शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पेनटाकळी प्रकल्पावरील यंत्रसामुग्री तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसात होणार असल्याने शहराला दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी दिली.

Water Problem : चिखलीकरांना भेडसावणारी पिवळ्या पाण्याची समस्या सुटणार; आमदार महालेंनी...
Cabinet Expansion : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा! समोर आली मोठी अपडेट

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी नगराध्यक्ष विमल देव्हडे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, सुभाषआप्पा झगडे, शैलेश बाहेती, माजी नगरसेवक गोविंद देव्हडे, विजय नाकवाल, माजी नगरसेविका ममता बाहेती, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अमोल साठे, शाम वाकदकर नगरपालिकेचे अभियंते पी. एस. भालेराव, एन. पी. इंगळे, मेहकर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच चिखली नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.