गधेवाल्यायले पोरगी कोन्ता बाप देईन सायेब?

गधेवाल्यायले पोरगी कोन्ता बाप देईन सायेब?
Updated on

बाभळी (दर्यापूर, जि. अमरावती) : पोरी भेटत नायी आमच्या समाजात पोरायले. उमर ढलून जाते. गधेवाल्यायचे मायबाप पोरी देवाले नायी पाहात. मच्छिंद्र भोई समाजाच्या (Machhindra Bhoi Samaj) तरुणांनी व्यथा सांगितली. पण तीही हसत हसत. दर्यापूर शहरातून गेलो की रस्त्यावर गाढवे दिसतात. गाढवे (Donkey) कुणाची आहेत, अशी चौकशी करताच, भोई लोक पाळतात, असे उत्तर मिळाले. मग भोईपुरा गाठला. चंद्रभागेतीरी जरा उंचशा टेकडीवर भोई समाजाचे लोक राहतात. येथील कार्यकर्ता राजेंद्र वाघमारे यांचे घर गाठले. त्यांनी येथील भोई समाजाचा सारा पट उलगडला. (The youth of Machhindra Bhoi community do not meet a girl for marriage)

चाळीसेएक घरांची ही वस्ती. भोई समाजाचा मूळ व्यवसाय मासेमारी. तो आता फारसे कुणी करीत नाहीत. राजेंद्र सांगू लागला. चार-पाच बुढे-बाढे जातेत. बाकीचे शेतमजुरी करतेत. मुख्य व्यवसाय गध्यावरून रेती-मातच्या खेपा टाकण्याचा आहे. साठक गधे आहेत या वस्तीत. कोनाचे बांधकाम असले का तो वाळू सांगतो. एक ब्रास वाळूचे पंधराशे रुपये भेटतात. त्यासाठी लय खेपा कराव्या लागते. चाळीस गध्याची एक ब्रास होते. जवान पोरायले मात्र गध्याचा धंदा करायची लाज वाटते, अशी माहितीही राजेंद्र वाघमारे यांनी दिली.

गधेवाल्यायले पोरगी कोन्ता बाप देईन सायेब?
वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

राजेंद्र स्वतः टेलर आहेत. त्यावरच त्यांची गुजराण चालते. या वस्तीत फिरून तरुणांसोबतही संवाद साधला. पवन नेमाडे बीकॉम झाला आहे. शिवा कोकडे दहावी झाला आहे. बोटावर मोजण्याएतकेच मुले दहावी-बारावी झाली आहेत. राजेंद्र वाघमारे यांचा एक भाऊ अरविंद शिक्षक आहे आणि त्यांच्या भावाच्या एका मुलाने इंजिनिअरिंग केले एवढेच.

गध्याचा धंदा तसाही बुडत चालला. चंद्रभागेतली वाळू सरत चालली. लोक ट्रॅक्टरनं वाळू नेते. पावसाळ्यात नदीत पाणी राह्यते. तव्हा धंदा बंदच राह्यते. आमचे गधे पाहून आमाला पोरीच भेटत नाही. गधेवाले पोरं पोरीयले कसे सांभाळतीन असा विचार पोरीचे मायबाप करतात, अशी खंत पवन, शिवा यांनी बोलून दाखविली. शंकर कुकडे आणि महादेव श्रीनाथ यांनीही याला दुजोरा दिला.

गधेवाल्यायले पोरगी कोन्ता बाप देईन सायेब?
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
मुळात शिक्षण कमी. त्यामुळे तरुणांना रोजगार नाही. परिणामी गध्यावरून धंदा करण्याची कामे करावी लागतात. या तरुणांकडे बघण्याचा आमच्याच समाजातील लोकांचा दृष्टीकोन योग्य नाही. व्यवसाय बदलविण्यासाठी कौशल्ये आणि कर्ज मिळावे.
- राजेंद्र वाघमारे, अध्यक्ष, मच्छिंद्रनाथ भोई समाज विकास संस्था, बाभळी-दर्यापूर, जि. अमरावती

(The youth of Machhindra Bhoi community do not meet a girl for marriage)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.