तिवसा (जि. अमरावती) : शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे भाडेतत्वावर राहत असलेल्या येथील पंचवटी चौका लागत असलेल्या घरी मध्यरात्री चोरट्यांनी हात साफ करीत पंचवीस हजार रोख रकम व इतर वस्तू लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उशिरा उघडकीस आली. शहराच्या पंचवटी चौकात पोलिसांची नेहमीच गस्त असताना सुद्धा चोरीची घटना घडल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या आठवड्याभऱ्या आधी वैभव वानखडे यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांच्या दुसऱ्या घरी दसव्याच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याने सहकुटुंब पंचवटी येथील घराला ताडे ठोकून वडिलांच्या घरी मुक्कामी होते. याचाच फायदा घेत भुरट्या चोरट्यांनी वानखडे यांच्या घराला लक्ष केले. शहराच्या पंचवटी चौक ते कुऱ्हा मार्ग लागतच वैभव वानखेडे यांचे घर आहे.
मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास काही चोरट्यांनी मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून रोख रक्कम पंचवीस हजार, एक अंगठी व गोप यासह विहिरीतील मोटर पंप चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते. पुढील तपास पोलिस करीत आहे.
शहराच्या माजी नगराध्यक्षांच्या घरी चोरी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. पंचवटी चौकात नेहमीच काळोखा अंधार राहत असल्याने याचा फायदा चोरट्यांना झाला. वानखडे यांचे घर अगदी रस्त्या लागत आहे. चौकापासून तर कुऱ्हा मार्गावर असलेले समर्थ लॉन, मॅजिक बार, यासह इतर काही ठिकाणच्या सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. मात्र, काहीच हालचाली यामध्ये दिसून आल्या नाही. डॉगस्कॉट मार्फत चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.