काय हे नशीब! 24 तासांत दिसले त्यांना 35 वाघ अन्‌ 40 बिबट 

tiger censes
tiger censes
Updated on

अमरावती : बुद्धपौर्णिमेला मेळघाट व्याघ्रप्रकल्पामध्ये होणारी वन्यप्राणी गणना (निसर्ग दर्शन) चालू वर्षात वन्यजीव प्रेमीविनाच झाली. वनकर्मचारी, वनमजूर यांनी 24 तासांच्या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांना 24 तासांमध्ये 35 वाघांसह 40 बिबट्यांचे दर्शन पाणवठ्यावर झाले. 

मेळघाट व्याघ्रप्रकल्पामध्ये त्यासाठी 546 मचाण या उपक्रमासाठी तयार करण्यात आले होते. त्यात एकूण विविध प्रजातींच्या 17 हजार 186 प्राण्यांना जवळून बघण्याची संधी वनकर्मचाऱ्यांना मिळाली. शिवाय 340 अस्वल, 172 रानकुत्रे, 752 गवे याशिवाय मोठ्या प्रमाणात तृणभक्षी प्राणी येथे आढळले. दरवर्षीच्या या उपक्रमात वन्यजीवप्रेमींना सहभाग घेता येतो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भात टाळण्यासाठी या मोहिमेला छोटे स्वरूप देण्यात आले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वगळता बाहेरच्या अशासकीय संस्था, निसर्गप्रेमींना सहभागी होता आले नाही.

मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागामध्ये 140, गुगामल 95, अकोट वन्यजीव विभागात 140, मेळघाट बफर क्षेत्रात 58 काटेपूर्णा, ज्ञानगंगा, कारंजा सोहळ या अभयारण्यामध्ये 56 तर, पांढरकवडा वन विभागातील टिपेश्‍वर व पैनंगगा अभयारण्यामध्ये 69 मचाण उभारले होते. एका मचाणावर एक व दोन कर्मचारी बसून त्यांनी वन्यप्राण्यांची गणना केली. वाघ, बिबट वगळता चितळ, रानडुक्कर, सांबर, यांसह इतर निशाचर प्राणी आढळून आले. चार वन्यजीव विभागातील 18 वनपरिक्षेत्रात निसर्ग अनुभव कार्यक्रम पूर्ण केला गेला. 

मेळघाट व्याघ्रप्रकल्प नैसर्गिक दृष्टीने संपन्न असून, वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. 
- श्रीनिवास रेड्डी, 
क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघप्रकल्प, अमरावती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.