गोंदिया : तलवारीने केक कापून जल्लोष साजरा करीत असतानाच मित्रांनी बंदूक हातात घेऊन हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचे गांभीर्य आेळखून पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. तीन जणांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) येथे करण्यात आली.
तलवारीद्वारे केक कापून तसेच हातात बंदूक घेऊन नाचण्याचा व वाढदिवसाचा जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.