Kuhi News : डबा पार्टी व पोहण्याचा मोह जीवावर बेतला; मटकाझरी तलावात कुटुंबातील तिघांना जलसमाधी

तलावाजवळ बसून डबा पार्टी करताना पोहण्याचा मोह झाल्याने तलावात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला.
jitendra shende, santosh bavane and nishedh popat
jitendra shende, santosh bavane and nishedh popatsakal
Updated on

कुही - तलावाजवळ बसून डबा पार्टी करताना पोहण्याचा मोह झाल्याने तलावात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतक नागपुरातील वाठोड्यातील असून ही ह्रदयद्रावक घटना कुही पोलिस हद्दीतील मटकाझरी येथे गुरुवारी घडली.

जितेंद्र इस्ताराम शेंडे (३५) रा. गुलमोहरनगर, भरतवाडा, संतोष किशोर बावणे (२५) रा. श्रावणनगर, वाठोडा, निषेध राजू पोपट (१२) रा. वाठोडा, नागपूर अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा तलावातून बाहेर काढण्यात आले.

नागपूर येथील एक कुटुंब, नातेवाईकांसह सात जण कारने पाचगाव सुरगाव येथील नातलगाच्या शेतात आंबे खाण्याकरिता गुरुवारी दुपारी गेले. पण झाडाला आंबे नसल्याने शेजारी असलेल्या मटकाझरी तलावाच्या कडेला डबा खाण्याचे त्यांनी ठरवले. उकाड्यामुळे जितेंद्र आणि संतोष यांनी डबा पार्टीपूर्वी तलावात अंघोळीचा निर्णय घेतला. दोघेही तलावात उतरले.

त्यांच्या पाठोपाठ बारा वर्षीय मुलगा निषेध पाण्यात उतरला. तिघेही खोल पाण्यात पोहत असताना अचानक जितेंद्र बुडू लागला. संतोष व निषेध त्याला वाचवायला गेले असता तेही बुडू लागले. हे बघून कारच्या चालकाने तलावात उडी घेऊन निषेधला तलावातून बाहेर काढले. परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

रात्री उशिरा काढले मृतदेह

या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांसह पोलिस घटनास्थळी पोहोचले. गुरुवारी रात्री उशिरापर्यत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. ज्योत्सना शेंडे, मंगला राजेश पोपट, देवांशी (८ वर्षे) अशी त्यांच्यासोबत शेतावर गेलेल्यांची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com