पाण्याच्या बॉटलमुळे गेला तिघांचा जीव; ते कसं वाचा...

पाण्याच्या बॉटलमुळे गेला तिघांचा जीव; ते कसं वाचा...
Updated on

यवतमाळ : प्रवासात तृष्णा भागविण्यासाठी पाण्याची बाटली हमखास ठेवली जाते. वाहनात बाटली ठेवण्यासाठी जागा असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. हीच पाण्याची बाटली अपघातास कारणीभूत ठरली आहे. पाण्याची बाटली कारमधील क्लच व ब्रेकमध्ये अडकून पडल्याने तिघांना आपला जीव गमवावा लागला. पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात झालेल्या अपघातातून बोध घेणे आवश्यक झाले आहे.

अशोक केंद्रे (वय ४५, रा. आंबासे जि. हरदा), अनंत पाटील (वय ४५, रा. कालकोंड जि. खंडवा) व अरविंद बाके (वय २५, रा. निसानिया जि. खंडवा) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये रामशंकर निर्भयदेव खोर (वय ३५, रा. कालकोंडा जि. हरदा) व तरसिंग राजपूत (वय ६५, रा. अवलीया जि. खंडवा) यांचा समावेश आहे.

पाण्याच्या बॉटलमुळे गेला तिघांचा जीव; ते कसं वाचा...
भेदरलेल्या हरिणींसारखी वारांगनांची गत; चिमुकले दुधापासून वंचित

मध्य प्रदेशातील प्रवासी वाशीममार्गे पुसद येथे मुलगी पाहण्यासाठी वाहनाने येत होते. खंडाळा घाटात गाडी आली असताना चालकाच्या पायाखाली बिसलेरीची बाटली अडकल्याने ब्रेक लागू शकले नाहीत. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मुख्य रस्त्यापासून ही गाडी जवळपास ७० ते ८० फुट दूर जाऊन वेगात झाडावर आदळली.

हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त गाडीतील तिघे जण जागीच ठार झालेत. तृष्णातृप्तीसाठी वाहनात पाण्याची बाटली ठेवत असताना सुरक्षित ठिकाणी ठेवली की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. नजरचुकीने एखादी क्षुल्लक चूक झाल्यास किती मोठी घटना घडू शकते. हे खंडाळा घाटातील घटनेने स्पष्ट होत आहे.

पाण्याच्या बॉटलमुळे गेला तिघांचा जीव; ते कसं वाचा...
पर्यायी कार्यक्रमांची काँग्रेसची परंपरा कायम
वाहन चालवताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. खंडाळा घाटात अपघात मानवी चुकीमुळे झाला आहे. चालकाच्या मागे आणि त्याच्या बाजूला कोणतीही वस्तू ठेवू नये. बाटलीमुळे राज्यात इतरही काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. योग्य काळजी घेतल्यास जीवितहानी टाळली जाऊ शकते.
- श्याम सोनटक्के, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, यवतमाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.