गोरेगाव (जि. गोंदिया) - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याने कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार जाहीर न केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे..तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून विजय रहांगडाले यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे पक्ष किंबहुना महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ते व निष्क्रिय कार्यकर्ते असे मतभेद उफाळून आला आहे. पक्षाने निष्क्रिय किंवा बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर करू नये, असे काँग्रेसचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.काँग्रेस पक्षात डॉ. जितेंद्र कटरे व पी. जी. कटरे उमेदवारी मिळवून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवार कोण होणार, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांसमोर आहे..तिरोडा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असणार, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी मिळणार, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांना आहे. आता या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी कोणत्या पक्षाच्या पदरात पडते, याकडे लक्ष लागून आहे.काँग्रेसमध्ये सक्रिय-निष्क्रीय वादकाँग्रेसने निष्क्रिय सदस्य व बाहेरील व्यक्तीच्या उमेदवारीसाठी विचार करू नये, सक्रिय कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा सूर उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट निर्माण झाले असून ९५ टक्के पक्ष कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात फक्त ५ टक्के पक्ष कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आघाडीच्या मित्र पक्षाने फक्त काँग्रेस पक्षाला उमेदवारी द्यावी, जेणेकरून ही जागा कायम राखण्यास मदत होईल, अशी मते पी. जी. कटरे, डॉ. जितेंद्र कटरे यांची आहेत..तर काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळण्याची भीतीया विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गेली, तर काँग्रेसचा मजबूत किल्ला ढासळण्याची भीती कार्यकर्त्यांना सतावू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे डॉ. जितेंद्र कटरे, पी. जी. कटरे उत्सुक असून, मीच खरा उमेदवार असा तर्क लावून उमेदवारी घोषणेची वाट पाहात आहेत. काँग्रेस पक्षात व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीवरून दुफळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.