समुद्रपूर (जि.वर्धा): पानसुपारी देऊन पाहुण्यांचा सन्मान करण्याची प्रथा आजही कायम कायम आहे. असे असताना आज तरुण पिढी माजा, गुटखा, तंबाखुच्या आहारी गेल्याने पान खाणे कमी झाले. याचा विपरीत परिणाम पान उत्पादकांसह विक्रेत्यांवर झाला आहे.
थंडीत पानांचे उत्पादन कमी होते. या मोसमात पानांच्या किमतीत चढ-उतार होतो. लहान-लहान पान विकेते शहरातून पान खरेदी करून ती ग्रामीण भागात किरकोळ दराने विकतात. या वर्षी लॉकडाउनमुळे या व्यवसायाला जबर फटका बसला. घरगुती व पानटपरीवर पान खाणाच्यांची संख्या कमी झाली.
या काळात तंबाखू, मावा, गुटख्याला तरुणाईने जवळ केल्याने बहुगुणी विड्याच्या पानांसाठी मागणी जेमतेम होत आहे. या विसंगती ने विड्याचे पानच आता रंगहीन होत आहे. पानात वापरले जाणारे मसालेही वधारल्याने ग्रामीण भागातील पान विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
औषधी गुणांमुळे विड्याच्या पानास फार पसंती होती. बैठकीतील तबकात त्याला स्थान होते. देवपूजा तसेच अन्य कार्यक्रमातही मान होता. काही जाणकार व्यक्तींशी संवाद साधला असता शंभर पाने ज्यावेळी खाल्ली जातात तेव्हा पावशेर तूप आहारात घेतल्यासारखे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. पूर्वी घराघरांत पानाची तबक असायची जेवणानंतर पानाच्या तबकात हात जायचा. पाहुण्यांना आवर्जून पानाचा विडा तयार करून दिला जायचा. शुभकार्य किंवा सण समारंभ, पूजेचा कलश असो की इतर धार्मिक कार्यक्रम या पानाशिवाय पार पडत नव्हते.
आता दिवसाची मजुरीही निघत नाही.
तंबाखू-गुटख्याला तरुणाईने जवळ केल्याने पानविड्याची रंगत आता आठवणीपुरती राहिली आहे. दिवसाची मंजुरी निघत नाही. इतर पानांच्या तुलनेत कलकता, बनारस, कपुरी या पानांना अधिक मागणी असते. पानाला अधिक भाव मिळतो. पान उत्पादक दलाल, अडते, लहान- व्यापारी अशी साखळी असते. पानांचे दर सतत बदलत असतात. सुपारी, मावा, गुटखा, तंबाखूमुळे पान खाणारांची संख्या कमी झाली. त्याचा परिणाम पान विक्री अन्य विक्रेत्यावर झाला आहे असे विधान येथील पाणमळेवाले बेलदार, पानविक्रेते सांगत आहेत.
संपादन -अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.