यवतमाळकरांनो, आजपासून कडक निर्बंध लागू; वाचा काय राहणार सुरु आणि काय बंद

यवतमाळकरांनो, आजपासून कडक निर्बंध लागू; वाचा काय राहणार सुरु आणि काय बंद
Updated on

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक दी चेन' अंतर्गत रविवारी (ता.नऊ) सकाळी सातपासून 15 मे सकाळी सातपर्यंत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश पारित केले आहेत. सर्व अत्यावश्‍यक सेवांच्या वेळा सकाळी अकरापर्यंत करण्यात आल्या आहेत. अत्यावश्‍यक सेवावगळता इतर दुकाने व दिलेल्या वेळेनंतरही नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. (Total lockdown in Yavatmal till 15 May as per Collectors orders)

यवतमाळकरांनो, आजपासून कडक निर्बंध लागू; वाचा काय राहणार सुरु आणि काय बंद
वय ८० वर्ष, HRTC स्कोर २० तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आजींची कोरोनावर मात

नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्‍यक, वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी आहे. किराणा दुकान, दुधडेअरी, बेकरी, मिठाई आदी खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी सात ते 11 वाजेपर्यंतच सुरू राहतील. आठवडी बाजार, पारंपरिक भाजीबाजाराची दुकाने, रस्त्यावर थांबून भाजीपाला व फळेविक्री करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

सोसायटी, कॉलनी व गल्लीत जाऊन भाजीपाला व फळेविक्री करण्यास सकाळी सात ते सकाळी 11 वाजेपर्यंत मुभा राहील. कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे, खते, कीटकनाशक विक्री केंद्र सात ते सकाळी 11 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. लग्नसमारंभ घरगुती स्वरूपात 25 लोकांच्या उपस्थितीत मर्यादेत पार पाडण्याच्या सूचना आहेत.

संबंधित तालुक्‍यांचे तहसीलदार यांच्याकडून लग्नाची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. नियम व अटीशर्तीचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व खासगी, शासकीय, नीमशासकीय कार्यालये बंद राहतील. अत्यावश्‍यक सेवेची कार्यालये सुरू राहतील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना बंदी राहील. कार्यालयांत अभ्यागत आढळून आल्यास त्यांच्यावर स्थानिक प्रशासनाकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल. संबंधित कार्यालयप्रमुखांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या, तक्रारी, निवेदने ई-मेल, व्हॉट्‌ऍप, दूरध्वनीने घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

यवतमाळकरांनो, आजपासून कडक निर्बंध लागू; वाचा काय राहणार सुरु आणि काय बंद
रुग्णांना दिलासा! अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे; उद्यापासून होणार रुजू

.... तर, बाहेर फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवणार

अत्यावश्‍यक किंवा वैद्यकीय कारणांशिवाय विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल. अशा लोकांची पथकाकडून कोविड चाचणी करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठीचा येणारा खर्च त्यांच्याकडूनच वसूल केला जाणार आहे.

(Total lockdown in Yavatmal till 15 May as per Collectors orders)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()