Traffic Police: बुलेट राजांवर पोलिसांची कडक कारवाई; कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ४४५ सायलेन्सरवर रोडरोलर

परभणी वाहतूक पोलिसांची कारवाई
Traffic Police
Traffic Policeesakal
Updated on

परभणी: शहरात बुलेटसह इतर दुचाकींना कर्णकर्कश सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकींविरुद्ध वाहतुक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. गत दोन वर्षांत असे १३ लाख ५० हजार रुपयांचे जप्त केलेले एकूण ४४५ सायलेन्सर शनिवारी वाहतूक पोलिसांनी रोडरोलर फिरवून नष्ट केले.

विस्ताराच्या मानाने परभणी शहर लहान असले तरी शहरातील वाहतुक व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात वाहतुक पोलिस यंत्रणेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कमी मनुष्यबळावर वाहतुक व्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Traffic Police
Yavatmal News : नवजात बालिकेला बिब्याचे चटके; सतत रडते म्हणून अघोरी उपाय!

गत काही वर्षांपासून शहरात बुलेट व इतर मोठ्या दुचाकींना जोरात आवाज करणारे कर्णकर्कश सायलेन्सर लावण्याचे फॅड आले आहे. दिवसासह रात्री-अपरात्री देखील हे दुचाकीचालक मोठ्याने आवाज करत फिरत असतात.

अशा कर्णकर्कश सायलेन्सर वापरणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत करून कारवाई सुरू केली होती. दोन वर्षांत वाहतुक पोलिसांनी १३ लाख ५० हजार रुपयांचे तब्बल ४४५ सायलेसन्सर जप्त केले आहेत. हे सायलेन्सर ध्वनी प्रदुषण करणारे होते.

शनिवारी पोलिस मुख्यालयाच्या आवारात ते सायलेन्सर रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आले. ही कारवाई करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड, फौजदार मकसुद पठाण मुस्ताक, राजेश्वर जुकटे.

Traffic Police
Yavatmal News: अंधश्रद्धेची परिसीमा! पोटाचा त्रास होत असल्याने नवजात शिशूच्या पोटावर बिब्याचे चटके

श्री. काजी, श्री. कच्छवे, श्री. लहाने, श्री. जाफर, श्री. पवार, श्री. देशमुख, श्री. पडोळे, महिला कर्मचारी श्रीमती बिंडे, श्रीमती डोंबे, श्रीमती व्हावळे, श्रीमती राठोड, श्रीमती भराडे, श्रीमती लोखंडे आदी कर्मचारी होते.

फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाईची गरज

परभणीत पोलिसांनी ज्या पद्धतीने सायलेन्सर जप्त करून ते नष्ट केले आहेत, त्याच धर्तीवरआता परत एकदा फॅन्सीनंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी परभणी शहरातील वाहनांची तपासणी करण्याची मोहीम वाहतुक पोलिसांना हाती घ्यावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.