आनंदची झाली राजराजेश्वरी; लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया

आनंदची झाली राजराजेश्वरी; लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया
Updated on

वर्धा : सावनेर येथील आनंद या युवकावर सावंगी मेघे रुग्णालयात यशस्वीरीत्या लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्यात आली. आनंदचे परिवर्तन राजराजेश्वरीत झाले आहे. मी स्वतःची ओळख स्थापित करण्यासाठी लढली व शस्त्रक्रियेद्वारे माझ्या मूळ रूपात आले, या शब्दात राजराजेश्वरीने आनंद जाहीरपणे पत्रकारांजवळ व्यक्त केला.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील ३१ वर्षीय आनंदवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. राजराजेश्वरी हे नवे नाव धारण करीत तिने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, हे पुरुषी शरीर आपले नाही, याची जाणीव बालवयातच झाले होती. माझे मुलींसारखे वागणे घरीदारी सर्वांना खटकत होते. परंतु, समजून कोणीच घेत नव्हते. अखेर घर सोडले आणि धर्मस्थळांचा आधार घेतला.

आनंदची झाली राजराजेश्वरी; लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया
महाराष्ट्राचा सुपूत्र पंतप्रधान का होऊ शकला नाही? गडकरींनी दिले उत्तर

सज्ञान झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात आले. वयाच्या तिशीनंतर मार्गदर्शक मिळाले. सावंगी मेघे रुग्णालयात योग्य उपचार मिळाले आणि शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली. मी एका जन्मातून मुक्त होऊन माझ्या मूळ रूपात आले आहे, अशी ती म्हणाली. पत्रपरिषदेला शल्यचिकित्सक डॉ. यशवंत लामतुरे, प्लास्टिक सर्जन डॉ. विवेक सुपाहा, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता पांडे, दीपक ओबेरॉय यांची उपस्थिती होती.

लिंगपरिवर्तन घडविणाऱ्या शस्त्रक्रिया भारतात केवळ ५१ सुपरस्पेशालिटी रुग्णालयात होतात. मध्यभारतातील ही कदाचित पहिली शस्त्रक्रिया असावी. आनंदची राजराजेश्वरी होण्याची ही प्रक्रिया पुढील सहा महिने सुरू राहणार आहे.
- डॉ. यशवंत लामतुरे, शल्यचिकित्सक
आनंदची झाली राजराजेश्वरी; लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया
यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...
बालवयात होणारे शारीरिक नैसर्गिक बदल पालकांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे आणि हे बदल मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजे. अन्यथा समाजाने हिणवले म्हणून काही मुले अनिच्छेने तृतीयपंथी होतात, तर काही थेट आत्मघाताचा मार्ग स्वीकारतात.
- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.