‘म्युकरमायकोसिस’वर उपचार शक्‍य; वाचा डॉ. आशीष पोडे यांचा सल्ला

‘म्युकरमायकोसिस’वर उपचार शक्‍य; वाचा डॉ. आशीष पोडे यांचा सल्ला
Updated on

चंद्रपूर : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेत रुग्णांची आणि मृत्यूची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनाच्या तावडीतून बरे होण्याची संख्याही मोठी आहे. मात्र, कोरोनापासून सुटका झालेल्या रुग्णांसमोर ‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) नावाचे नवे संकट उभे ठाकले आहे. कोविडच्या आजारातील औषधोपचारामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. या बुरशीजन्य आजारावर शक्‍य तेवढ्या लवकर उपचार घेतल्यास मात करता येते. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन चंद्रपुरातील प्रसिद्ध नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. आशीष पोडे (Dr. Ashish Pode) यांनी केले आहे. (Treatment for Mucormycosis infarction is possible but not delayed)

चंद्रपुरात म्युकरमायकोसिसचे तीसच्यावर रुग्ण आढळले आहेत. यातील बऱ्याच रुग्णांवर यशस्वी उपचार आणि शस्त्रक्रिया डॉ. पोडे यांनी केल्या आहेत. या आजाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. यापार्श्‍वभूमीवर डॉ. पोडे यांनी आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी ‘सकाळ’शी संवाद साधला. म्युकरमायकोसिसची लक्षण रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाही. मुळात हा दुर्मिळ बुरशीचा प्रकार आहेत.

‘म्युकरमायकोसिस’वर उपचार शक्‍य; वाचा डॉ. आशीष पोडे यांचा सल्ला
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

दैनंदिन जीवनात बरेचजण या बुरशीच्या संपर्कात येतात. परंतु, बहुतांश लोकांना यापासून धोका नसतो. मात्र, रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास ही बुरशी फुफ्फूस किंवा सायनसेसमध्ये पसरून संसर्ग करते. विशेषतः एचआयव्ही बाधित, कर्करोग, मधुमेही आणि अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींनी या बुरशीचा लागण होण्याची शक्‍यता अधिक असते, असे डॉ. पोडे यांनी सांगितले.

आता कोविडतून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण, कोविड उपचारादरम्यान करण्यात येणाऱ्या औषधांच्या माऱ्यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखर अनियंत्रित होते. कोविड रुग्णांनी दिल्या जाणाऱ्या इंजेक्‍शनमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोरोनातून सुटल्यानंतर रुग्ण म्युकरमायकोसिसच्या तावडीत सापडतात.

या आजारात नाकामध्ये बुरशी वाहून ती सायनसेसमध्ये पसरते. नाकातील अवयवास होणारा रक्तपुरवठा खंडित करते. त्यामुळे नाकातील अवयव काळे पडायला लागतात. तिथूनच हा आजार डोळे, जबडा आणि मेंदूमध्ये पसरतो. त्यामुळे लक्षणे आढळल्याबरोबर डॉक्‍टरांकडे तपासणी केली पाहिजे. त्यामुळे या आजाराला गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वी अटकाव करणे शक्‍य होते, असे डॉ. पोडे म्हणाले.

‘म्युकरमायकोसिस’वर उपचार शक्‍य; वाचा डॉ. आशीष पोडे यांचा सल्ला
बापासाठी अखेरचा ठरला मुलाचा वाढदिवस, तलावात बुडून बाप अन् लेकाचा मृत्यू

शस्त्रक्रियेचा पर्याय

१५ दिवसांमध्ये म्युकोरमायकोसिसच्या १६ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. त्यातील काही रुग्णांच्या डोळ्यातही हा आजार पसल्याचे समोर आले. त्यामुळे या आजाराचे लवकरात-लवकर निदान करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावा. एन्डोस्कोपी सर्जरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाकाद्वारे डोळ्यात पसरलेला आजार आणि इतर ठिकाण पोहोचलेला आजार शस्त्रक्रिया करून पूर्णपणे काढून टाकता येतो, असे डॉ. पोडे यांनी सांगितले.

लक्षणे

  • नाकामध्ये कोरडेपणा, खपल्या जमा होणे

  • चेहऱ्याची बाजू बधीर होणे, गालावर दुखणे

  • डोळ्याभोवती दुखणे, डोळे लाल होणे

  • डोकेदुखी, श्‍वास घेण्यास त्रास होणे

  • डोळ्यांनी कमी दिसणे, मानसिक स्थिती बदलणे

(Treatment for Mucormycosis infarction is possible but not delayed)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.