कौतुकास्पद! युवा प्रो-कबड्डी लिगची जिल्हा चाचणी स्पर्धा; गोंदिया जिल्ह्यातील ४ खेळाडूंची निवड 

trials of pro kabaddi league in gondia 4 players are selected for state
trials of pro kabaddi league in gondia 4 players are selected for state
Updated on

तिरोडा (जि. गोंदिया) ः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना आपली कला कौशल्य खेळाच्या माध्यमातून दाखवण्याची सुवर्ण संधी निर्माण करण्यासाठी क्रीडासंकुल एसएन मोर कॉलेज तुमसर येथे जिल्हा चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली. 

गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या खेळाडूंची ‘कबड्डी स्पर्धा युवा खेल कुद-अभियान’ दिल्ली अंतर्गत संचालित युवा प्रो कबड्डी लिग या संधीचा पुरेपूर फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंनी घ्यावा. या उद्देशाने युवा कबड्डी लिग गोंदिया व भंडाराची स्पर्धा घेण्यात आली. 

स्पर्धेच्या उद्‍घाटनाप्रसंगी विदर्भ युवा कबड्डी लिगचे प्रमुख बाबा आगलावे, गोंदिया जिल्हा युवा कबड्डी लिगचे प्रमुख सुनील शेंडे, बाळकृष्ण टांगले, भंडारा जिल्हा युवा कबड्डी लिगप्रमुख रवी मोहतुरे, महानू हुडरा, गरीब सहाळा, कार्यालयीन कर्मचारी हरिभाऊ माळी धुळे, राहुल देवरे, राहुल पारधी, मनोहर माळी, चुन्नीलाल पावरा, खुशाल पिंजारघरे, राहुल रहांगडाले आदी उपस्थित होते.

 या स्पर्धेत ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ४ खेळाडूंची निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये मयूर रूपचंद झगेकार, रोहित राजेश सोनुले, तेजस अरुण नैत्राम, सुनील ब्रीजलाल उईके यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील एका खेळाडूंची निवड झाली.

त्यात पूर्वेश भोजराम मडावी यांचा समावेश आहे. या खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी लिग स्पर्धा धुळेकरिता निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. यासाठी १२ कंपन्यांमधील उत्कृष्ट खेळाडूची खरेदी करून त्यांना युवा प्रिमियर लिग स्पर्धेत खेळविण्यात येणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.