अमरावती जिल्ह्यातील वाढोणाचे त्र्यंबक गायकवाड बनले गावासाठी स्वच्छतादूत  

swachatadoot
swachatadoot
Updated on

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः गेल्या २३ वर्षांपासून अगदी पहाटे उठून गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम वाढोणा येथील त्र्यंबक गायकवाड यांनी जोपासला आहे. या त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते गावासाठी ‘स्वच्छतादूत’ ठरले आहेत.

गाडगेबाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तिथी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी, असे सांगत दीनदुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्रतंत्र, चमत्कार असल्या अनेक गोष्टींवर विश्‍वास ठेवू नका, अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्यागांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. 

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रुढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. त्यानुसार तालुक्‍यातील वाढोणा येथे गाडगे महाराजांच्या सांगितलेल्या विचारांवर निरंतर स्वत:च्या गावाला स्वतःचे घर समजून गेल्या २३ वर्षांपासून गावामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड, नाल्यांची सफाई, गटारे उपसणे ही सर्व कामे निष्काम भावनेने आणि निःस्वार्थीपणाने त्र्यंबकराव गुलाब गायकवाड करीत आहेत. 

दररोज सकाळी चार वाजेपासून ७.३० वाजेपर्यंत आपली सेवा गावासाठी देत आहेत. आपल्या दोन एकर शेतीमध्ये फुलांची लागवड करून वर्षेभर फुलांचा व्यवसाय करतात आणि गावासाठी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारला प्रत्येक घरी मोफत बेलाचे ११-११ पाने देणे असा हा दरवर्षीचा उपक्रम आहे. गेल्या २३ वर्षांपूर्वी गुरुदेव सेवा मंडळाचे तुकाराम दादा गीताचार्य हे वाढोणा येथे आले होते. त्यांच्या कार्याने व विचाराने प्रेरित होऊन आपल्या गावाची सेवा निःस्वार्थ, निष्काम भावनेने करीत आहेत.

शासनाने कार्याची दखल घ्यावी

२३ वर्षांपासून सतत गावासाठी राबत असलेल्या, काटेगोटे वेचुनि फुले देणाऱ्या त्र्यंबक गायकवाड यांना यांच्या निष्काम व निःस्वार्थ कामाचा मान मिळावा यासाठी शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी समोर आली आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()