आर्णी (जि. यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील तालुक्यातील कोसदनी घाटाजवळ सिमेंट घेऊन जाणारा भरधाव ट्रक जनावरांच्या कळपात घुसला. या अपघातात तीन जनावरे जागीच गतप्राण झाली, तर पाच जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात बुधवारी (ता. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास झाला.
आर्णी तालुक्यातील कोसदनी घाट म्हणजे नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या घटना आता नित्याच्याच झालेल्या आहेत. सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोसदनी येथील गायी चाराईसाठी जंगलात जात होत्या. त्याचवेळी समोरून एमएच ३४ बी जी २३१७ या क्रमांकाचा भरधाव ट्रक नागपूरवरून नांदेडकडे सिमेंट घेऊन जात होता. ट्रकचा वेग अमर्यादित असल्याने चालकाचे त्याच्यावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या गायींच्या कळपात हा ट्रक घुसला. या अपघातात आठ गायी चिरडल्या गेल्या.
कोसदनी येथील ग्रामस्थ भगवान उत्तम ठाकरे, विनोद माणिक ठाकरे, संजय राठोड यांच्या गायी जागेवरच गतप्राण झाल्या, तर इतर पाच गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने कोसदनी येथील ग्रामस्थ भगवान उत्तम ठाकरे, विनोद माणिक ठाकरे, संजय राठोड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेऊन या मार्गावर वेगनियंत्रित करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी या भागातील वाहनधारकांसह नागरिकांकडून केली जात आहे.
मदतीसाठी ग्रामस्थांनी घेतली धाव
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील तालुक्यातील कोसदनी घाटाजवळ ट्रकने गायींना चिरडल्याचे लक्षात येताच कोसदनी येथील ग्रामस्थ निळकंठ ठाकरे, विकास ठाकरे, चंद्रशेखर जोशी, ज्ञानेश्वर पिंपळकर, शामू वाघमोडे, रूपेश शेलोकार, संजय राठोड, विनोद ठाकरे यांच्यासह आदी ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली व जखमी गायींना ट्रक खालून बाहेर काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.