चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या (Tadoba Dark Tiger Project) पळसगावात वाघिणीने दोन बछड्यांसह धुमाकूळ घातला. दोघांवर हल्ला (Tigers attack both) केला. यात वनविभागाचा कर्मचारी आणि गावकरी गंभीर जखमी झाले. सध्या वाघांना जंगलात हकलण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहेत. चरणदास बन्सोड, सुनील व्यंकटराव गजलवार अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. २३) घडली. (Two-calves-and-tiger-attack-civilians-in-Chandrapur)
चिमूर तालुक्यातील पळसगाव हे ताडोबा जंगलातील बफर झोनलगतच वसले आहे. काही दिवसांपासून गावाला लागून असलेल्या झुडपात वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांचा वावर वाढला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास गावातील हनुमान मंदिराच्या परिसरात वाघिणीसह तिचे बछडे आले. वाघिणीच्या डरकाळ्या सुरू झाल्याने गावकरी जागे झाले. गावात भीती पसरली. गावकऱ्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली.
रात्रीच वनविभागाची चमू गावात आली. मात्र, वाघिणीसह दोन बछडे असल्याने अतिरिक्त कर्मचारी बोलविण्यात आले. कर्मचारी येतपर्यंत दिवस उजळला. वनविभागासोबत पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला. त्यानंतर बुधवारी सकाळपासून वाघिणीसह तिच्या बछड्यांना हाकलून लावण्याचे प्रयत्न सुरू झाले.
यात चवताळलेल्या वाघिणीने वनविभागाचा कर्मचारी सुनील व्यंकटराव गजलवार आणि चरणदास बन्सोड या गावकऱ्यावर हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना आधी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपुरात हलविण्यात आले.
परमेश्वर नरसिंग तांबुळगे, संभाजी देवीदास बळदे यांनी समयसूचकता दाखवत सुनील गजलवार आणि चरणदास बन्सोड यांना वाघिणीच्या तावडीतून सोडविले. घटनास्थळी चिमूरचे उपविभागीय अधिकारी, एपीआय मंगेश मोहोड, पीएसआय राजू गायकवाड, अलीम शेख हे अन्य कर्मचाऱ्यांसह पळसगाव दाखल झाले. वनपरिक्षेत्राधिकारी मनीषा जाधव यांच्या नेतृत्वात वाघिणी व बछड्यांना जंगलात हाकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिघेही जंगलाच्या दिशेने पळून गेले. मात्र, ते पुन्हा परतू शकतात या भीतीने गावकरी अस्वस्थ आहेत.
हंगाम संकटात
खरिपाचा हंगाम सुरू झाला. शेतकरी, महिला मजुरांनी शेतावर जाणे सुरू केले होते. मात्र, या भागात वाघांचा वावर वाढल्याने भीती पसरली आहे. अनेक जण शेतात जाणे टाळत आहेत. वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
(Two-calves-and-tiger-attack-civilians-in-Chandrapur)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.