Gadchiroli Accident : बस उलटून वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर

अहेरी येथून अमरावती जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना रस्त्याच्या कडेला खोल भागात उलटल्याने वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत.
Gadchiroli Accident
Gadchiroli Accidentsakal
Updated on

गडचिरोली : अहेरी येथून अमरावती जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना रस्त्याच्या कडेला खोल भागात उलटल्याने वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवार २५ मे २०२४ सकाळी १० वाजता लगाम ते आष्टी रस्त्यावरील धनूर येथे वनविभागाच्या नाक्याजवळ घडली. अपघातातील जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहेरी आगाराची एम एच-०७ सी-९४६३ क्रमांकाची बस जवळपास २७ प्रवाशांना घेऊन शनिवारी सकाळी ८.३० वाजता अमरावतीसाठी निघाली. अहेरीवरून वर्धामार्गे ही बस अमरावतीला जाते. अहेरीपासून ३५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनूर येथे वनविभागाच्या नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना बाजूला खोल भागात उलटली.

या बसमध्ये चालक पी.आर.मेश्राम, वाहक डी.एस.मेश्राम यांच्यासह २७ प्रवासी होते. अपघातात वाहक डी.एस.मेश्राम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. विशेष म्हणजे बसमध्ये वाहक असलेले डी.एस.मेश्राम यांची मुलगी प्रवास करत होती. तिलासुद्धा दुखापत झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अहेरी आगाराचे व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेत उर्वरित प्रवाशांची विचारपूस केली. तसेच या बसमधील प्रवाशांना इतर वाहनाने पुढे पाठविले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.त्यामुळे काही वेळासाठी या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.