आर्वी (जि. वर्धा) : येथील राणे हॉस्पिटलमध्ये भारती असलेल्या आजोबासाठी अमरावतीवरून रक्त घेऊन येत असताना भरधाव कारला अपघात झाला. यात नातू आणि जावई दोघेही जागीच ठार झाले. हृदय हेलावून टाकणारी ही घटना शुक्रवारी (ता. दोन) रात्री घडली. भूषण संजय चाफले (वय २२, रा. नांदपूर) व मिलिंद पिंपळकर (वय २६, रा. नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.
येथील कन्नमवार शाळेत शिक्षक असलेल्या विनायकराव भाकरे यांनी प्रकृती साथ देत नसल्याने वर्षभरापूर्वी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. यानंतर त्यांच्यावर येथील राणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. उपचारा दरम्यान रक्ताची आवश्यकता भासल्यामुळे, नातू भूषण चाफले व त्यांचे जावाई मिलिंद पिंपळकर हे दोघेही शुक्रवारी लगबगीने एमएच ३२ ए एच ५६१७ क्रमांकाच्या कारने अमरावती येथील रक्तपेढीत गेले. तेथेसुद्धा रक्ताचा तुटवडा होता.
परिणामी त्यांना रक्तदान करण्यास सांगण्यात आले. नातू भूषण चाफले याने आजोबाला वाचविण्यासाठी स्वत:चे रक्त दिले. याबदल्यात रक्त पेढीकडून दोन रक्त पिशव्या घेत ते दोघे परत निघाले. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान भिवापूर लगत असलेल्या वळणावर त्यांची कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्याकडेला उलटली. यात कारचा तर चुराडा झालाच शिवाय जबर मार लागल्याने दोघेही ठार झाले. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे नांदपूर येथे शोककळा पसरली आहे.
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविशिल्डचा दुसरा डोज घेतला आणि प्रकृती अस्वस्थ झाली. परिणामी सेवाग्राम येथे उपचारासाठी भरती केले. मात्र, शनिवारी पहाटे उपचारादरम्यान पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. राजेंद्र शंकर माळोदे असे मृताचे नाव बसून, ते येथील पोलिस ठाण्यात एएसआय पदावर कार्यरत होते. त्यांनी कोविशिल्डचा पहिला डोज घेतला होता.
त्यानंतर २२ मार्चला उपजिल्हा रुग्णालयात दुसरा डोज घेतला. मात्र, हा डोज घेताच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोरोना टेस्ट करण्यात आली. यात अहवाल सकारात्मक आला. शनिवारी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे भाऊ विजय माळोदे यांनी दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.