‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम

Two sister left home for love
Two sister left home for love
Updated on

नागपूर : ‘डिअर मम्मी-पप्पा... तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नेहमी गुंतलेले असता... आम्हाला तुमच्या प्रेमाची, मायेची गरज आहे... पण, आम्हाला अजिबात वेळ देत नाही. आमच्यावर प्रेम करणारे आणि जीव लावणाऱ्यांचा शोध आम्ही घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी आम्ही घर सोडतोय... सॉरी, प्लिज आमचा शोध घेऊ नका...’ अशी चिठ्ठी लिहून १५ व १७ वर्षीय बहिणींनी घर सोडले आणि प्रियकराच्या भेटीसाठी थेट गुजरात गाठले... परंतु, यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोणताही अनर्थ होण्यापूर्वीच दोघ्या बहिणींना गुजरातमधून ताब्यात घेतले. त्यांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले... पालक वर्गाचे खाडकन डोळे उघडणारी घटना नागपुरात उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित दाम्पत्य उपराजधानीतील यशोधरानगर परिसरात राहते. नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर कार्यरत असतानाच दोघांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना दोन मुली. मोठी प्रिया १७ वर्षांची बारावीत तर लहान रिया १५ वर्षाची दहावीत (काल्पनिक नाव). दोघीही नामांकित कॉंव्हेंटमध्ये शिकतात.

बिझनेसमुळे आई-वडिलाचे दोन्ही मुलींकडे दुर्लक्ष झाले. त्यांना पाहिजे तेवढा वेळ देत नव्हते. ‘आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम नाही. त्यांचा आपल्यावर जीव नाही.’ असा समज त्यांना झाला. त्यामुळे दोघीही बहिणी आई-वडिलावर नाराज राहत होत्या.

लॉकडाऊनमुळे वडिलांनी त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन दिला. ऑनलाईन क्लास अटेंड केल्यानंतर प्रियाने इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले. तसेच तिने रियालाही अकाऊंट उघडून दिले. दोघीही क्लास झाल्यावर तासनतास ऑनलाईन राहत होत्या. त्यातून त्यांची अहमदाबादमधील दोन युवकांशी ओळख झाली.

इंस्टाग्रामवर भेटला इरफान

प्रियाची इंस्टाग्रामवरून गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कंपनीत जॉब करणाऱ्या इरफानशी ओळख झाली. दोघांची रोच चॅटिंग सुरू झाली. तिने घरात आम्ही दोघी बहिणी एकाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने तिच्या बहिणीलाही आपला युसूफ नावाचा मित्र शोधून दिला. दोघ्याही बहिणी दोघांच्याही प्रेमात पडल्या. इंस्टाग्रामवरून त्या संपर्कात होत्या.

प्रेमात झाल्या वेड्या

प्रिया आणि रिया यांना इरफान आणि युसूफच्या प्रेमात वेड्या झाल्या. दोघांनीही त्यांना जीव लावला. त्यांना थेट लग्नाचे आमिष दाखवले. आई-वडिलांवर नाराज असलेल्या दोघेही बहिणींनी उर्वरित आयुष्य प्रियकरासोबत घालविण्याचा विचार केला. शुक्रवारी (ता. २७) घर सोडून जात असल्याची चिठ्ठी लिहिली आणि थेट बस पकडून अहमदाबाद शहर गाठले. तेथे प्रियकर त्यांची वाट पाहत उभे होते.

पोलिसांमुळे टळला अनर्थ

मुलींच्या वडिलांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. त्यांनी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांना लगेच तांत्रिक तपास करण्यास सांगितले. पीएसआय चव्हाण यांनी मुलींचा लॅपटॉप ताब्यात घेतला. लॅपटॉपमधून इंस्टाग्राम प्रियकराबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच अहमदाबाद पोलिसांशी संपर्क केला. त्यांनी दोन्ही प्रियकरांना ताब्यात घेतले तर बसने अहमदाबाद पोहोचताच नागपूर पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. अशाप्रकारे यशोधरानगर पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.