Yavatmal Accident Case : आमदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणात दोन शिक्षिका निलंबित

Yavatmal Latest News In Marathi |बेजबाबदारपणामुळे मुलीचा मृत्यू ओढवल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रस्ता रोको केला व शिक्षिकांना निलंबित करण्याची मागणी केली.
Yavatmal Accident Case
Yavatmal Accident Case Sakal
Updated on

पुसद : पुसदवरून हिंगोलीकडे जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत आमदरी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे शौचालय कोसळले. ही घटना सोमवार (ता. १५) रोजी सकाळी ११ वाजता घडली. त्या ढिगाऱ्याखाली लघुशंकेला गेलेली इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मात्र ही बाब शिक्षिकांना कळलीच नाही.

त्यांच्या बेजबाबदारपणामुळे मुलीचा मृत्यू ओढवल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रस्ता रोको केला व शिक्षिकांना निलंबित करण्याची मागणी केली. अखेर गट शिक्षण अधिकारी यांनी बेजबाबदार दोन शिक्षिकांना तत्काळ निलंबित केले.

निलंबित करण्यात आलेल्या शिक्षिकांची नावे रीना गौतम मून व शीला परसराम नवले अशी आहेत. मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृत शीतल पांडुरंग किरोले (वय नऊ) रा.आमदरी या मुलीवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी सुशीला आवटे, केंद्रप्रमुख प्रकाश टेकाळे, शिक्षण विस्तार अधिकारी शीतल वानखेडे, शालेय पोषण अधीक्षक अमर राठोड तसेच खंडाळा पोलिस निरीक्षक देविदास पाटील, उपनिरीक्षक देवानंद कायंदे, नायब तहसीलदार कदम व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण गेल्याने ट्रकने रोड लगतच्या शाळेतील शौचालयाला धडक दिली. त्यावेळी शाळेची नेमकी प्रार्थना होऊन पहिली व दुसरीचे ४० विद्यार्थी वर्गात बसलेले होते. त्याचवेळी दुसरीतील शीतल लघु शंकेला शौचालयात गेलेली होती.

या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली व शिक्षिकांना सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी बरोबर आहेत ना, अशी विचारणा केली. त्यावर शिक्षिकांनी सर्वच विद्यार्थिनी आहेत असे उत्तर दिले. दरम्यान शीतलचे दप्तर शाळेतच होते. तरीही शिक्षिकांना कुठलाही संशय आला नाही.

दप्तर शाळेत, मुलगी कुठे ?

अपघातानंतर पोलिसांनी शाळेच्या शिक्षिकांकडे मुली सुरक्षित आहेत का याची चौकशी केली. वर्गात ४० विद्यार्थी होते. यातील शीतल त्याचवेळी लघुशंकेला गेली होती. तिचे दप्तर वर्गात होते. तरीही शिक्षिकांना दप्तर शाळेत, मुलगी कुठे ? असा साधा प्रश्नही पडला नाही. उलट सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तिचे दप्तरही वर्ग मैत्रिणीसोबत तिच्या घरी पाठविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com