अमरावती : दुचाकीने जात असताना रस्त्यात युवकाची विवाहितेसोबत भेट झाली. ती एका मुलाची आई आहे. युवकाने स्वत:चे नावही खोटे सांगितले. दुचाकीवरून तिचे अपहरण केले. मध्यप्रदेशात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर गावाकडे घेऊन जात असताना मुलासह पीडितेला दुचाकीवरून ढकलून दिले. २८ वर्षीय महिला व दोन वर्षांचा मुलगा हे दोघेही या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले. जखमी आई आणि मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी तक्रारीवरून संशयित आरोपी तुलसी पंजाब पडोळे (वय २५, रा. अंबाडा) विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी अटक केली. आठवड्यापूर्वी महिला दोन वर्षांच्या मुलाला घेऊन ब्राम्हणवाडा येथील रुग्णालयात आली होती. रुग्णालयातून गावाकडे परत जात असताना रस्त्यात तिची भेट तुलसी सोबत झाली. तुलसीने तिचा विश्वास संपादन केला. तिला आधार देण्याचे आश्वासन दिले. लग्नाचेही आमिष दाखविले. परंतु, महिलेला त्याने स्वत:चे नाव अमोल आठवले (रा. अंबाडा) असे सांगितले होते.
महिलेला तिच्या मुलासह तुलसी आपल्या गावात घेऊन आला. गावात कुजबूज सुरू झाल्यानंतर तुलसी महिला व मुलास घेऊन मध्यप्रदेश येथील कालवा या गावात गेला. तेथे चार दिवस दोघेही भाड्याची खोली घेऊन राहिले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला, असा आरोपी महिलेने दाखल तक्रारीत केला.
तेथे दोघांमध्ये वाद झाला. काही लोकांनी त्यांना हटकले. त्यामुळे महिला व लहान मुलाला गावी सोडून देतो, असे म्हणून दुचाकीने तो मध्यप्रदेश येथून निघाला. धावत्या दुचाकीवरून रस्त्यात महिला व मुलाला रस्त्यावर ढकलून देऊन तो पळाला. ग्रामस्थांनी महिला व मुलास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
इर्वीनमध्ये ब्राम्हणवाडा थडी पोलिसांना बयाण देताना तिने अत्याचार करणाऱ्याचे नाव अमोल आठवले, अंबाडा असे सांगितले. त्याआधारे पोलिसांनी अंबाडासह सात ते आठ गावात जाऊन त्या नावाचे व्यक्तीचा शोध घेतला. परंतु, सदर नावाचा युवकच आसपास राहत नसल्याचे चौकशीतून पुढे आले.
सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
महिलेला आधार देण्याच्या बहाण्याने खोटे नाव सांगून फसवीणारा तुलसी पडोळे हा पसार होण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवापर्यंत (ता. १२) पोलिस कोठडी सुनावली आहे.
- दीपक वळवी,
पोलिस निरीक्षक, ब्राम्हणवाडा थडी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.