‘उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिरवा झेंडा हाती धरला’

Kirit Somaiya
Kirit SomaiyaKirit Somaiya
Updated on

अमरावती : अमरावतीमध्ये १२ नोव्हेंबरला निघालेल्या मोर्चाला ठाकरे सरकारचे (Uddhav Thackeray) समर्थन होते. कुणाच्या प्रोत्साहनाने हा मोर्चा निघाला त्याची चौकशी करावी. अमरावतीमधील (Amravati Close) घटना ही १९९२-९३च्या दंगलीचे डिझाईन होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हिंदूंसाठी रस्त्यावर उतरले होते. आता त्यांचे पुत्र सत्तेसाठी लांगूलचालन करीत आहे, असा आरोप भाजपचे (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला.

अमरावती शहराच्या दौऱ्यावर आलेले किरीट सोमय्या प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, महापौर चेतन गावंडे, पक्षनेता तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी उपस्थित होते. १२ तारखेची घटना घडली नसती तर १३ चीही घटना घडली नसती. १३ तारखेची घटना उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. शहराच्या दंगलग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर शहर अजूनही शांत नसल्याचे जाणवले आहे. १२ नोव्हेंबरला शहरात निघालेल्या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना सरकारचे समर्थन होते, असा आरोप करीत त्यांनी चौकशीची मागणी केली.

Kirit Somaiya
अविश्वसनीय! झेनोबॉट्स रोबोट देणार बाळाला जन्म!; वैज्ञानिकांचा दावा

महाविकास आघाडी सरकारमधील नेते विशेषतः ठाकरे व शरद पवार १३ नोव्हेंबरच्या घटनेचे हिशेब मागतात. ते आदल्या दिवशीच्या घटनेवर शांत का राहतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत मोर्चाला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे समर्थन होते, हे सिद्ध होत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिरवा झेंडा हाती धरला आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी काँग्रेस-एनसीपीसोबत समझोता केला आहे. त्यांच्या राज्यात हिंदूंना लक्ष्य केले जात असून यापुढे परत हल्ला झाल्यास ठाकरे सरकारची जबाबदारी अधिक असेल, असा इशाराच त्यांनी दिला. प्रसार माध्यमांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी सोयीस्कररीत्या बगल दिली. हिंसाचाराच्या घटना घटत असताना बंदचे आवाहन करणारे भाजपचे नेते कुठे होते. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अखेरपर्यंत टाळले.

Kirit Somaiya
प्रौढ खेळण्याला दिला माजी महिला सैनिकाचा चेहरा; अन्...

आणखी चार नेते रडारवर

ठाकरे सरकारमधील मंत्री व नेत्यांचे आतापर्यंत ४० पैकी २९ घोटाळे बाहेर काढले असून काही दिवसांतच चार मंत्र्यांचे घोटाळे जाहीर करणार आहे. यामध्ये दोन शिवसेनेचे व ठाकरे मित्रपरिवारातील आहेत, तर एक काँग्रेस व एक राष्ट्रवादीचा आहे. काँग्रेसचा मंत्री विदर्भातील असल्याचा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()