महाराष्ट्र दिनापासून नागपूर-शिर्डी वाहतूक; बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

udhav thakare says, Transport from Nagpur to Shirdi from Maharashtra Day
udhav thakare says, Transport from Nagpur to Shirdi from Maharashtra Day
Updated on

अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या समृद्धी महामार्गाचे म्हणजेच आजच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी केली आणि १ मे २०२१ म्हणजेच महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डी दरम्यान वाहतूक सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य सरकारसाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

समृध्दी महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी करण्यासाठी ते आज अमरावती आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी महारार्गाचं काम सुरू होतं. येत्या १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरू होईल, असे त्यांनी जाहीर केले. मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसूलापूर परिसरात समृद्धी महामार्गाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे ७०० किमीचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.