अमरावती : जिल्ह्याच्या आठ मतदारसंघांतून हा निवडून येणार व तो पडणार, अशा चर्चा सध्या सुरू असल्या तरी जिल्ह्याच्या एकाही मतदारसंघातून कोणीच शुअर नाही. एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी स्थिती नाही. बंडखोरांनी प्रस्थापितांचे गणित बिघडविले असून काही ठिकाणी झालेल्या तिरंगी लढतीमुळे मतविभाजन कुणाच्या पत्थ्यावर पडणार याची चाचपणी केल्या जात आहे.