यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. अगदी क्षुल्लक वादाचं रूपांतर कधी प्राणघातक हल्ल्यात होईल सांगता येत नाही. अशीच एक घटना जिल्ह्यातील घाटंजी इथे घडली आहे.
शेतात काम करण्यासाठी चुलत बहिणीसोबत गेलेल्या तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान घाटंजीपासून काही अंतरावर असलेल्या मारेगाव रोड शिवारात घडली.
राखी ढोणे (वय२२,रा. घाटी बेघर),असे गंभीर जखमी तरुणीचे नाव आहे. राखी शेतात काम करीत असताना संशयित चिंतामण कवडू ढोणे (वय२७) याने काही विचार न करता तरुणीच्या पोटात चाकू खुपसला. तीन ते चार घाव पोटात भोसकल्याने राखी रक्ताने माखली आणि खाली कोसळली. दरम्यान तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला.
लगेच तिच्या काकाने खांद्यावर उचलून तीन किलो मीटर अंतर पायपीट करीत रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोर घोघरे फरार मारेकरी तरुणाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे घाटंजी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.