मोखाडा - गेली चार दिवसांपासून मोखाड्यात अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात कोसळत आहे. पहिले दोन दिवस तुरळक पाऊस पडला आहे. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी कोसळलेल्या अवकाळी वादळी पावसाने मोखाड्याला झोडपले आहे. काही भागात गारपीठ ही झाली आहे.
या वादळी पावसाने तालुक्यातील 65 हुन अधिक घरांचे नुकसान होऊन, वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या वादळी पावसाने आणि गारपीठीने लोकसभा निवडणुकीचा प्रचार ही गारठला आहे.
मोखाड्यात ऊन्हाच्या काहीलीने त्रस्त झालेल्या नागरीकांना अवकाळी पावसाने, हवेत गारवा निर्माण करून दिलासा दिला आहे. तालुक्यात दोन दिवस तुरळक पाऊस पडला आहे. मात्र, सोमवार आणि मंगळवारी 13 व 14 मे ला तालुक्यात मुसळधार वादळी पाऊस कोसळला आहे. काही भागात गारपीठ ही झाली आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तर जोशात आलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार गारठला आहे.
सलग चार दिवस झालेल्या अवकाळी वादळी पावसाने तालुक्यातील डोल्हारा साखरवाडी येथील भगवान दापट, सिताराम दोरे यांच्या घरावरील तसेच ब्राम्हणगांव येथील शाळेचे छप्पर ऊडाले आहे. सावर्डे येथील यादव पादीर, चंद्रकांत पादीर यांचे घरांचे नुकसान झाले आहे.
तर भोवाडी येथील नवसु दिघा यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराची पडझड झाली आहे. येथे सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. पाचघर मध्ये ही घरांचे नुकसान झाले आहे. यांसह तालुक्यात सुमारे 65 हुन अधिक घरांचे नुकसान आणि पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती घेत, तलाठी पंचनामे करत आहेत. त्याबाबतची माहिती तातडीने तहसीलदार कार्यालयाला कळविली जात आहे. तालुक्यात 65 हुन अधिक घरांचे किरकोळ नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसीलदार मयुर खेंगले यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.